येवल्यात शिक्षिकेसह मुलीवर शेजाऱ्यांकडून हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 18:34 IST2020-09-18T18:32:14+5:302020-09-18T18:34:50+5:30

येवला : अतिक्र मण प्रश्नावरून शिक्षिका आण ितिच्या मुलीवर शेजाऱ्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.

Neighbors attack girl and teacher in Yeola | येवल्यात शिक्षिकेसह मुलीवर शेजाऱ्यांकडून हल्ला

येवल्यात शिक्षिकेसह मुलीवर शेजाऱ्यांकडून हल्ला

ठळक मुद्देसुनिता यांच्या हाताला मोठी जखम होवून १९ टाके पडले

लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : अतिक्र मण प्रश्नावरून शिक्षिका आण ितिच्या मुलीवर शेजाऱ्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.
शहरातील हुडको वसाहतीत राहणाºया शिक्षिका सुनीता पाटील, मुलगी प्रियंका निकम यांनी घरालगत असणाºया अतिक्र मणाने रस्ता बंद केल्याची तक्र ार केल्याचा राग धरून शेजारी राहणाºया पोळ कुटुंबाने या दोघींना बेदम मारहाण केली. यात सुनिता यांच्या हाताला मोठी जखम होवून १९ टाके पडले असून डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर प्रियांकाच्या हाताला, पोटाला आणि पायाला जबर मार लागला आहे.
या प्रकरणी सुनीता पाटील यांच्या फिर्यादीवरून येवला पोलीस ठाण्यात सचिन पोळ, वैशाली पोळ, ऋ तिक पोळ, योगेश पोळ, प्रतिभा पोळ, प्रतिभा भालेराव, सुभाष बोरसे, अशोक खैरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी माय-लेकींना उपचारसाठी येवला ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, संशयित आरोपींपैकी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य काही संशयित फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: Neighbors attack girl and teacher in Yeola