NEET पेपर विकणाऱ्या डॉक्टर शुभमने ॲडमिशन घेतले पण कॉलेजला गेलाच नाही; मग प्रॅक्टिस कोठे केली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 18:54 IST2026-05-13T18:46:15+5:302026-05-13T18:54:09+5:30

नीट पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शुभम खैरनारला सीबीआयने ताब्यात घेतलं आहे.

NEET paper leak accused Shubham Khairnar never attended college after admission | NEET पेपर विकणाऱ्या डॉक्टर शुभमने ॲडमिशन घेतले पण कॉलेजला गेलाच नाही; मग प्रॅक्टिस कोठे केली?

NEET पेपर विकणाऱ्या डॉक्टर शुभमने ॲडमिशन घेतले पण कॉलेजला गेलाच नाही; मग प्रॅक्टिस कोठे केली?

NEET Paper Leak: देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट-यूजी २०२६ पेपर लीक प्रकरणात आता धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणात नाशिकमधून अटक करण्यात आलेला संशयित शुभम खैरनार याच्याबद्दल नवनवीन माहिती समोर येत आहे. शुभमचे कनेक्शन आता मध्य प्रदेशातील सीहोरशी जोडले गेले असून, त्याने गेस पेपरच्या नावाखाली लाखांची उलाढाल केल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे.

मुंबई कोर्टाकडून ट्रान्झिट रिमांड; आता दिल्लीत चौकशी

बुधवारी शुभम खैरनारला मुंबईतील किला कोर्टात हजर करण्यात आले होते. सुनावणीनंतर कोर्टाने त्याला दोन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर करत सीबीआयच्या स्वाधीन केले आहे. सीबीआय आज संध्याकाळच्या विमानाने त्याला दिल्लीला घेऊन जाणार असून, गुरुवारी दिल्लीतील सीबीआय कोर्टात त्याला हजर केले जाईल. शुभमच्या मागे एक मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून, इतर साथीदारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याची कोठडी महत्त्वाची असल्याचे सीबीआयने म्हटले.

सीहोरच्या युनिव्हर्सिटीशी कनेक्शन आणि धक्कादायक वास्तव

शुभम खैरनार हा मध्य प्रदेशातील सीहोर येथील श्री सत्य साई युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी असल्याचे समोर आले. त्याने २०२१ मध्ये बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता. मात्र, युनिव्हर्सिटी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, प्रवेश घेतल्यापासून तो एकदाही वर्गात आला नाही, ना त्याने कोणती परीक्षा दिली. तो कधीही कॅम्पसमध्ये फिरकला नाही किंवा विद्यापीठाच्या कोणत्याही उपक्रमात सहभागी झाला नाही, असे कुलगुरू मुकेश तिवारी यांनी स्पष्ट केले आहे.

असा झाला १० लाखांचा व्यवहार

शुभमने पुण्याच्या एका संशयिताकडून १० लाख रुपयांना गेस पेपर विकत घेतला होता. त्यानंतर त्याने तोच पेपर हरियाणातील एका ग्राहकाला १५ लाख रुपयांना विकला. राजस्थानात तपासादरम्यान एक हस्तलिखित पेपर मिळाला होता, ज्यातील प्रश्न नीट परीक्षेच्या पेपरशी मिळतेजुळते होते. जीवशास्त्राचे सर्व ९० आणि रसायनशास्त्राचे ४५ प्रश्न या गेस पेपरमध्ये होते.

मंदिरात दर्शनाला गेला अन् जाळ्यात अडकला

मूळचा नाशिक जिल्ह्यातील नांदगावचा रहिवासी असलेल्या शुभमचे वडीलही डॉक्टर असल्याचे सांगितले जाते. शुभम नाशिकमध्ये एका फ्लॅटमध्ये राहून प्रॅक्टिस करत होता. बुधवारी तो आपल्या फ्लॅटजवळील मंदिरात दर्शनासाठी गेला असताना नाशिक गुन्हे शाखेने त्याला सापळा रचून ताब्यात घेतले.
 

Web Title : NEET पेपर लीक: डॉक्टर ने पेपर बेचा, कॉलेज छोड़ा, प्रैक्टिस कहाँ?

Web Summary : नीट पेपर लीक मामले में नासिक से गिरफ्तार डॉक्टर शुभम ने एडमिशन के बाद भी आयुर्वेदिक कॉलेज नहीं गया। मध्य प्रदेश से कनेक्शन के साथ, उसने कथित तौर पर लाभ के लिए लीक हुए पेपर खरीदे और बेचे। वह अपने फ्लैट के पास पकड़ा गया।

Web Title : NEET Paper Leak: Doctor sold paper, skipped college, practiced where?

Web Summary : NEET paper leak suspect, Dr. Shubham, arrested in Nashik, never attended Ayurveda college despite admission. He allegedly bought and sold leaked papers for profit, with connections to Madhya Pradesh. He was caught near his flat.