शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

समाजकेंद्रित होण्याची गरज:रावसाहेब कसबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:22 IST

नाशिक : सध्याच्या स्थितीत लोक मोठ्या प्रमाणात आत्मकेंद्री होत असल्याने समाजातील दुर्लक्षित व वंचित घटकांच्या समस्या व अडचणींमध्ये वाढ होत असून, मानवाने आत्मकेंद्री न राहता समाजकेंद्री होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी व्यक्त के ले आहे.

ठळक मुद्देराज्यस्तरीय जाणीव पुरस्कार प्रदान सोहळा

नाशिक : सध्याच्या स्थितीत लोक मोठ्या प्रमाणात आत्मकेंद्री होत असल्याने समाजातील दुर्लक्षित व वंचित घटकांच्या समस्या व अडचणींमध्ये वाढ होत असून, मानवाने आत्मकेंद्री न राहता समाजकेंद्री होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी व्यक्त के ले आहे.परशुराम साईखेडकर नाट्यगृहात जाणीव सांस्कृतिक अभियान संस्थेतर्फे रविवारी (दि.३) राज्यस्तरीय ‘जाणीव पुरस्कार २०१७-१८’ प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर वीरमाता नीलाताई आमले, महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे उपसंचालक डॉ. जालिंदर सुपेकर, माहिती तंत्रज्ञान संचालक श्रद्धा बेलसरे, उद्योजक अतुल वाघ आदी उपस्थित होते. रावसाहेब कसबे म्हणाले, समाजातील एक घटक व्यक्तिगतरीत्या भौतिक गरजांवर मोठ्या प्रमाणात खर्च करीत असताना दुसरा घटक मात्र पायाभूत सोयी-सुविधांपासूनही वंचित आहे. याचा विचार करून लोकांनी स्वयंस्फुर्तीने भौतिक गरजांवर मर्यादा आणण्याची गरज असल्याचे मत कसबे यांनी व्यक्त केले, तर समाजातील बोथट झालेल्या जाणिवा जागृत क रण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याचे मत श्रद्धा बेलसरे यांनी व्यक्त केले, तर पुरस्काराला उत्तर देताना समाजातील विविध घटांक ांमध्ये मानुसकीच्या जाणिवेचा ओलावा जागृत होण्याची गरज उद्योजक उज्ज्वला हावरे, प्रकाश बोरकर, आर. विमला आदींनी व्यक्त केली. प्रास्ताविक अभियानचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन सीमा पेठकर यांनी केले.पुरस्कारार्थींचा सन्मानसमाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीचा महाराष्ट्र राज्य जाणीव सांस्कृतिक अभियानतर्फे जाणीव पुरस्कारांनी करण्यात आला. यात महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय एन. सूर्यवंशी, उद्योजक उज्ज्वला हावरे, नाशिक परिमंडळ आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. बी. डी. पवार, महिला व बालविकास विभागाच्या सहायक आयुक्त सुवर्णा पवार, उद्योजक रेणुका पाटील,हेल्प एज इंडियाचे संचालक प्रकाश बोरगावकर, जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता रामनाथ आरोटे, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती यतिंद्र पगार, डॉ. मनीषा जगताप, नागपूरच्या स्मार्ट सिटी प्रकल्पताचे कार्यकारी अभियंता नरेश बोरकर जळगाव वनविभागाचे सहायक वनसंरक्षक सुभाष पाटील, जलसंपदाचे सहायक अभियंता दिलीप काळे, उद्योजक कैलास देवरे आदींचा जाणीव पुरस्काराने गौरव करण्यात आला.