शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय मेंदू सप्ताहास प्रारंभ

By admin | Updated: December 20, 2015 23:05 IST

न्यूरॉलॉजी इंडियन अकॅडमीचा उपक्रम : जनजागृतीवर भर

नाशिक : मेंदूशी संबंधित आजारांबाबत जनजागृती व्हावी, यासाठी न्यूरॉलॉजी इंडियन अकॅडमीतर्फे ‘राष्ट्रीय मेंदू आठवडा’ साजरा केला जातो़ या सप्ताहास शनिवारी (दि़१८) सुरुवात झाली असून, तो २४ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे़ या कालावधीत मेंदूच्या आजारांकडे दुर्लक्ष न करता उपचारांबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी प्रबोधन केले जाणार असल्याची माहिती संघटनेचे डॉ़ मनोज गुल्हाने यांनी आयएमए सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली़डॉ़ गुल्हाणे यांनी सांगितले की, शहरातील मेंदूतज्ज्ञांचे क्लिनिक, हॉस्पिटल तसेच सार्वजनिक ठिकाणी मेंदू व मेंदूसंलग्न आजारांबाबत या सप्ताहात मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जाणार आहे़ १९९१ मध्ये न्यूरोलॉजी अकॅडमीची स्थापना झाल्यानंतर दरवर्षी १८ ते २४ डिसेंबर हा सप्ताह मेंदू सप्ताह म्हणून साजरा केला जातो़ ब्रेन ट्यूमर व मेंदूज्वर हे दोनच आजार नागरिकांना माहिती आहेत़ मात्र, मेंदूशी संबंधित अनेक आजार असून, त्याबाबत माहिती नसल्याने हे आजार बळावतात व जीव गमवावा लागतो़ मेंदूच्या आजारासाठी लठ्ठपणा, धूम्रपान, उच्चरक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, हृदयरोग, मद्यसेवन, एका जागेवर बसून काम करण्याची सवय आदि कारणीभूत ठरतात़ नाशिक जिल्ह्यातील किमान दहा टक्के नागरिकांना कोणत्या न कोणत्या स्वरूपाचा मेंदूशी संबंधित आजार आहे, यामध्ये मायग्रेनचे (डोकेदुखी) प्रमाण अधिक असून, याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते़मेंदूचे सुमारे ९० टक्के आजार हे पूर्णपणे बरे होणारे आहेत़ नागरिकांनी वारंवार होणारी तीव्र डोकेदुखी, फिट याकडे दुर्लक्ष न करता यावर त्वरित मेंदूतज्ज्ञांकडून उपचार करून घेणे गरजेचे असल्याचे उपस्थित मेंदूविकार तज्ज्ञांनी सांगितले़ यावेळी डॉ. धनंजय डुबेरकर, डॉ. श्रीपाल शाह, डॉ. सुहास पाटील, डॉ. राहुल बाविस्कर, डॉ. भूषण उभाळे, डॉ. आनंद दिवाण, डॉ. श्रीकांत पाळेकर, डॉ़ अमित येवले यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)