कोमजलेला ‘बालहक्क दिन’ (विश्लेषण)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 06:54 PM2019-11-21T18:54:51+5:302019-11-21T19:05:54+5:30

‘बालहक्क दिन’ बालकांचा हक्क आणि अधिकाराचे संरक्षण होण्यासाठी जनमानसात जनजागृती करण्याबरोबरच बालकांना मूळ प्रवाहात आणण्याची संवेदना जागरूक करण्याचा हा ...

nashik,warm-up,child,rights,day' (analysis) | कोमजलेला ‘बालहक्क दिन’ (विश्लेषण)

कोमजलेला ‘बालहक्क दिन’ (विश्लेषण)

Next

‘बालहक्क दिन’ बालकांचा हक्क आणि अधिकाराचे संरक्षण होण्यासाठी जनमानसात जनजागृती करण्याबरोबरच बालकांना मूळ प्रवाहात आणण्याची संवेदना जागरूक करण्याचा हा दिवस. संयुक्त राष्टÑसंघाने २० नोव्हेंबर १९८९ रोजी बालहक्क संहिता स्वीकारली आणि बालकांचे हक्क तसेच सुरक्षा याविषयीची जाणीव जागृती करण्यासाठी १९० देशांनी बालकांचे हक्क मंजूर करण्याच्या मसुद्याला मान्यता दिली. २० नोव्हेंबर उलटून दोन दिवस झाले आहेत. समाज आणि प्रशासन अशा दोन्ही पातळ्यांवर शहरात मात्र बालहक्कांच्या कार्यक्रमांची कुठेही जाणीव जागृत होताना दिसली नाही. खरेतर १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत बालहक्कासाठी सप्ताहाच साजरा करण्याचे संयुक्त राष्टÑसंघाचे संकेत आहेत. परंतु बालहक्काविषयी कुणाला काहीहीएक देणे-घेणे नसावे असेच शहरातील वातावरण राहिले. बालकांच्या त्यांच्या हक्कांपर्यंत पोहोचविण्यासाठीचा कोणताही प्रशासकीय आणि सामाजिक कार्यक्रम शहरात होऊ शकला नाही. शहराच्या कानाकोपऱ्यास एखादा कार्यक्रम झाला असेल त्याचेही समर्थन करता येणारे नाही. जागृती कार्यक्रम हे कोणत्या कोनाड्यात घेऊन उपयोगाचे होणार नाही याचीदेखील संबंधितांना समज द्यावी लागणार असेल तर बालकांना हक्क प्रदान करण्याच्या प्रवाहात असा छोटा विचार कितपत टिकणार हाही मुद्दा दुर्लक्षित करून चालणार नाही. खरेतर बाल हक्काच्या दिवशी तरी निदान झोपडपट्टी, सिग्नलवरील मुलांच्या हक्काची चर्चा होईल, असे वाटले होते. परंतु शहरात असा कुठलाच सोहळा होताना दिसला नाही.
बालहक्क दिनानिमित्ताने दफ्तरविना शाळा, बालसभा, हक्क आणि अधिकाराचे मार्गदर्शन, आनंददायी खेळ, छंद स्पर्धा, शाळा परिसरातील धोक्याच्या जागा दूर करणे, शाळा व्यवस्थापन समितीची सभा, मुलांच्या हक्क आणि संरक्षणावर चर्चा, बाल हक्काबाबतच्या स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा , पोस्टर बनविणे, चित्र काढणे असे विविध उपक्रम राबविणे अपेक्षित आहे किंबहूना १४ ते २० नोव्हेंबर या सप्ताहात असे उपक्रम घ्यावेत असे संयुक्त राष्टÑसंघाचे निर्देश आहेत. मात्र एकूणच संवेदना हरविलेले समाजमन आणि प्रशासकीय उदासीनता यात ‘बालहक्कदिन‘ कोमजून गेला असेच म्हणावे लागेल.
खरेतर बालहक्काच्या मुद्दाला मान्यता देताना बालहक्काच्या जाणिवांची मोठी यादी अनेक देशांनी मान्य केलेली आहे. परंतु यंत्रणाच उदासीन असेल तर बालहक्काची जनजागृती होणारच नाही. असेच काहीसे शहरात घडले. शहरात कुठेही मुलांचे आरोग्य, शिक्षण, पोषण आहार, याविषयीचे कार्यक्रम, बालविवाह, बालमजूर, लैंगिक शोषणाविरुद्धचा आवाज उठला नाही. अन्य दिवशी बालकांच्या हक्काची पायमल्ली होत असतेच ‘बालहक्क दिनी’देखील तेच घडून गेले. बालकेहक्कापासून दुर्लक्षितच राहिली.

Web Title: nashik,warm-up,child,rights,day' (analysis)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.