शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये दोन सराईत गुन्हेगारांकडून चार लाखांचे मोबाईल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 18:26 IST

नाशिक : शहरातील आठवडे बाजारासह गंगाघाटावरील भाजीबाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचे मोबाईल चोरणा-या पंचवटीतील दोघा सराईत चोरट्यांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने जबरी लुटीच्या गुन्ह्यात अटक केली आहे़ या दोघांच्या सखोल चौकशीतून त्यांनी चोरी केलेले चार लाख रुपये किमतीचे ३५ महागडे मोबाईलही जप्त करण्यात आले असून त्यांचा एक साथीदार फरार झाला ...

ठळक मुद्देगुन्हे शाखेची कारवाई : भाजीबाजारात चोरी३५ महागडे मोबाईल जप्त ; एक साथीदार फरार

नाशिक : शहरातील आठवडे बाजारासह गंगाघाटावरील भाजीबाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचे मोबाईल चोरणा-या पंचवटीतील दोघा सराईत चोरट्यांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने जबरी लुटीच्या गुन्ह्यात अटक केली आहे़ या दोघांच्या सखोल चौकशीतून त्यांनी चोरी केलेले चार लाख रुपये किमतीचे ३५ महागडे मोबाईलही जप्त करण्यात आले असून त्यांचा एक साथीदार फरार झाला आहे़ दरम्यान, या तिस-या साथीदाराच्या अटकेनंतर आणखीण मोबाईल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़गंगाघाटावरील भाजीबाजारात भाजीपाला खरेदी केल्यानंतर घराकडे मोबाईलवरून बोलत जाणा-या इसमाच्या डोक्यात फटका मारून मोबाईल लूट करणा-या तिघा संशयितांची माहिती शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे व पोलीस शिपाई स्वप्निल जुंदे्र यांना मिळाली होती़ त्यानुसार संशयित राहूल भिकन कासार (१९, रा.मायको दवाखाना परिसर, पंचवटी) व विकी उर्फ टेम-या विजय भुजबळ (१९, रा.मोरेमळा,हनुमानवाडी, पंचवटी ) हे दोघे ठक्कर बाजार परिसरात मोबाईल विकण्यासाठी आले असता त्यांना सापळा लावून अटक केली़ तर त्यांचा तिसरा साथीदार सोनल उर्फ चिवड्या दशरथ बागड हा फरार झाला़पोलिसांनी या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर गोदाघाटावरील भाजीबाजारात तब्बल ३५ महागडे मोबाईल चोरल्याची कबुली दिली़ त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली अ‍ॅक्टिवा दुचाकी (एमएच १५ ईव्ही ८५८२) व मोबाईल असा सुमारे ४ लाख तीन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ दरम्यान, तिस-या साथीदाराच्या अटकेनंतर अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून कासार व भुजबळ यांना जबरी लुटीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे़या दोघा सराईत गुन्हेगारांकडून जप्त केलेल्या मोबाईलचे आयएमईआय नंबरची यादी शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या कार्यालयात लावण्यात आली आहे़ ज्या नागरिकांचे मोबाईल चोरीस गेलेले आहेत त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा़- आनंदा वाघ, पोलीस निरीक्षक, शहर गुन्हे शाखा, युनिट एक़

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसCrimeगुन्हा