शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक मनपा कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमानुसारच वेतन मिळणार; अतिरिक्त वेतनाचा प्रस्ताव फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 15:56 IST

नगरविकास खात्याचा निर्णय; कर्मचारी लढ्याच्या तयारीत

नाशिक-  महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे तसे आदेश आज महापालिकेला प्राप्त झाले आहेत मात्र सदरचे वेतनश्रेणी देताना शासनाच्या पद समकक्ष वेतनश्रेणी पेक्षा अधिक वेतन देता येणार नाही असेही स्पष्टीकरण राज्य शासनाने दिले आहे. त्यामूळे शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांपेक्षा वेतन घेणाऱ्या महापालिकेतील कर्मचाऱ्यांची अडचण झाली असून त्यांनी लढ्याची तयारी सुरू केली आहे. नाशिक महापालिकेत सुमारे सात हजार कर्मचारी असून त्यांना यापूर्वी सहाव्या वेतन आयोगावर दहा टक्के अतिरिक्त वेतनवाढ देऊन महापालिकेने त्यानुसार वेतन अदा केले आहे त्यामुळे शासकीय पदांवरील आधिकारी कर्मचाऱ्यांपेक्षा नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन जास्त आहे. अर्थात, त्यासाठी नाशिक महापालिकेने शासनाची मान्यता त्यावेळी घेतली होती.

 मात्र यंदा राज्य शासनाने सातवा वेतन आयोग लागू करताना निमशासकीय संस्थांना शासकीय पद समकक्ष वेतनश्रेणी देणे बंधनकारक केले आहे त्यामुळे नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन कमी वाढणार आहे तर काहींचे वेतन आहे त्यापेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापूर्वीच्या आदेशानुसारच कर्मचाऱ्यांना सातव्या वेतनवाढीत  अतिरिक्त वेतन देण्यासंदर्भात महापालिकेच्या महासभेत ठराव करण्यात आला होता त्यानुसार मनपा आयुक्तांनी शासनाला प्रस्ताव पाठवला होता मात्र शासनाने हा प्रस्ताव फेटाळला असून शासन पद्धत समकक्ष वेतनश्रेणी द्यावी असे आदेशित केले आहे.दरम्यान, या आदेशामूळे कर्मचाऱ्यात काहीसे नाराजीचे वातावरण आहे. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे आणि सरचिटणीस राजेंद्र मोरे यांनी शासनाकडून पाठपुरावा करून अतिरिक वेतनवाढीचा प्रश्न सोडवू असं सांगितलं तर अन्य संघटनांनी लढा उभारण्याची तयारी केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका