शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात पाच हजार ३४८ विद्यार्थ्यांनी दिली राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 14:52 IST

राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी दहावीत शिक्षक असलेल्या विद्यार्थ्यांना प्रविष्ठ होता येते. राज्यभरातून एकूण ९४ हजार ५१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून नाशिक जिल्ह्यातील १८ परीक्षा केंद्रावर सुमारे ५ हजार ३४८ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा दिली.

ठळक मुद्देजिल्ह्यातील १८ केंद्रावर प्रज्ञाशोध परीक्षा पाच हजार ३४८ विद्यार्थ्यांची कसोटी बौद्धीक व शालेय क्षमतेची चाचणी

नाशिक : जिल्ह्यातील १८ परीक्षा केंद्रावर रविवारी (दि.१७) जिल्हाभरातून सुमारे ५ हजार ३४८ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा दिली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या या परीक्षेला जिल्हाभरातून ५ हजार ५९६ विद्यार्थ्यांनी नियमित व ८ विद्यार्थ्यांनी विलंबशुल्कासह मूदतीत नोंदणी केली होती. त्यापैकी ५ हजार ३४८ विद्यार्थ्यांनी परीक्षेला उपस्थिती लावली,तर १९६ विद्यार्थ्यांनी मात्र या परीक्षेला दांडी मारल्याची माहिती सुत्रांनी दिली.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी दहावीत शिक्षक असलेल्या विद्यार्थ्यांना प्रविष्ठ होता येते. राज्यभरातून एकूण ९४ हजार ५१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून या सुमारे ७ हजार ९० शाळांमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यापूर्वी राज्यभरातून ८६ हजार २८१ विद्यार्थी बसले होते. यातील २६१ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहे. नाशिक जिल्ह्यात यावर्षी  वेगवेगळ््या १८ परीक्षा केंद्रावर जिल्हाभरातील सुमारे ५ हजार ३४८ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा दिली. तर १९६ विद्यार्थ्यांनी मात्र या परीक्षेला दांडी मारली. परिक्षेचा पहिला पेपर सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० यावेळत बौद्धिक क्षमचा चाचणी तर दुसरा पेपर दुपारी १.३० ते ३. या वेळेत शालेय क्षमता चाचणीचा घेण्यात आला. दोन्ही पेपरमध्ये प्रत्येकी १०० गुणांचे शंभर प्रश्न विचारण्यात आले होते. दरम्यान, या परीक्षेचा निकाल महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर एक महिन्याच्या कालावधीत जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थीexamपरीक्षा