शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतीतले खांदेपालट !

By किरण अग्रवाल | Updated: June 3, 2018 02:08 IST

ग्रामपंचायत ते नगरपंचायत, असा टप्पा गाठत विकासाच्या मार्गावर धावू पाहणाऱ्या जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींमध्ये नेतृत्वाचा खांदेपालट झाला असून, नवीन पदाधिकाºयांकडेही पूर्वीइतक्याच अपेक्षेने बघितले जाणे स्वाभाविक आहे.

ठळक मुद्देअडीच वर्षांपूर्वी प्रथमच निवडणुका पार पडल्या उर्वरित काळासाठी खांदेपालट झाला खांदेपालट नवीन करून दाखविणारा ठरो

ग्रामपंचायत ते नगरपंचायत, असा टप्पा गाठत विकासाच्या मार्गावर धावू पाहणाऱ्या जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींमध्ये नेतृत्वाचा खांदेपालट झाला असून, नवीन पदाधिकाºयांकडेही पूर्वीइतक्याच अपेक्षेने बघितले जाणे स्वाभाविक आहे. ग्रामपालिकांना नगरपंचायतींचा दर्जा मिळाल्यानंतरच्या पहिल्याच पंचवार्षिकमधील हा नेतृत्वबदल असल्यानेही यासंदर्भातील अपेक्षा जरा अधिकच्याच म्हणता याव्यात.जिल्ह्यातील कळवण, देवळा, चांदवड, पेठ, सुरगाणा आणि निफाड या सहाही ग्रामपंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा देण्यात आल्यानंतर अडीच वर्षांपूर्वी प्रथमच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडल्या होत्या. ग्रामविकासाकडून नगरविकासाची संधी म्हणून त्यावेळी पहिल्या पदाधिकाºयांकडून अपेक्षा केली गेली होती. त्यातील काहींनी त्या दिशेने चांगली पावले उचलल्याचेही दिसून आले. परंतु अडीच वर्षांच्या या पहिल्या आवर्तनात व्यवस्था बदलातील नवीनता जाणून घेण्यातही अनेकांचा वेळ गेला. आता उर्वरित काळासाठी खांदेपालट झाला असून, या पदाधिकाºयांकडून केल्या जाणाºया कामांच्या बळावर पुढच्या वेळी त्यांच्या पक्षांना थेट निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. म्हणूनही या पदाधिकाºयांकडून जरा जास्तीच्याच अपेक्षा केल्या जात आहे. विशेष म्हणजे, महापालिका व मोठ्या स्तरावर पक्षीय अभिनिवेशातून काही गोष्टी घडून येताना दिसत असल्या तरी नगरपंचायत, परिषद स्तरावर तितकीशी पक्षीय आढ्यता नसते. कळवणचेच उदाहरण घ्या, काँग्रेस व भाजपा-शिवसेना हे तसे पारंपरिक विरोधक; सद्यस्थितीत तर शिवसेना व भाजपातही टोकाचे वितुष्ट आलेले आहे व स्वबळाची आजमावणी सुरू आहे; परंतु असे असताना कळवण नगरपंचायतीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा व शिवसेना अशा साºयांनी मिळून विकास आघाडी केली आहे. तेथे साºयांचे व्यवस्थित सुरू आहे. विकासात राजकारण नकोच; पण कळवण शेजारच्या सुरगाण्यात मात्र शिवसेना-भाजपाचे बहुमत असूनही यंदा भाजपाने आपली ‘टर्म’ पूर्ण करून घेतल्यावर शिवसेनेचे बोट सोडून दिले, त्यामुळे सेनेला उपनगराध्यक्ष पदावर समाधान मानावे लागले. या दोन्ही पक्षांत त्यामुळे नाराजीचा सुरुंग लागून गेला आहे. दुसरे असे की, खांदेपालट झाला असला तरी काही ठिकाणच्या सत्तेचे सूत्रधार तीच मंडळी राहणार आहे. देवळ्यात दुसºया आवर्तनातही पहिल्याच नगराध्यक्षांकडे सूत्रे आली आहे. चांदवडमध्ये कालचे नगराध्यक्षच आज उपनगराध्यक्षपदी विराजमान झाले आहेत, तर कळवण येथे काल नगराध्यक्ष असलेल्यांचे पतीच आज उपनगराध्यक्ष बनले आहेत. तेव्हा म्हणायला, पंचवार्षिक सत्तेच्या दुसºया आवर्तनात नेतृत्व बदल झालेला असला तरी सूत्रे तशी जुन्यांकडेच दिसत आहेत. सुरगाण्यात प्रथमच दोन्ही पदांवर महिलाराज अवतरले आहे. या सर्वच नव्या पदाधिकाºयांची जबाबदारी यासाठीही वाढून गेली आहे की, पहिल्या अडीच वर्षाच्या काळात त्यांना संस्थागत बदललेल्या व्यवस्थेची माहिती होऊन गेली आहे. त्यामुळे आता विकासाच्या प्रक्रियेला वेग देऊन नागरिकांच्या अपेक्षापूर्तीच्या दिशेने ठोस कार्यक्रम राबवावा लागेल. त्यादृष्टीने सर्वच नगरपंचायतींमधील खांदेपालट नवीन काही घडविणारा व वेगळे काही करून दाखविणारा ठरो हीच अपेक्षा.

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूक