शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

मनपा हटविणार स्वत:चे आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 00:37 IST

महापालिकेच्या दोन वर्षांपूर्वीच् या विकास आराखड्यात दर्शविलेले पाणीपुरवठा विभागाच्या कामासाठी असलेले आपलेच आरक्षण हटविण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठी महासभेत मंजूर केलेल्या ठरावानुसार बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रानजीक असलेले आरक्षण हटविण्यासाठी महापालिकेने शुक्रवारी (दि.१५) अधिसूचना काढली आहे.

नाशिक : महापालिकेच्या दोन वर्षांपूर्वीच्या विकास आराखड्यात दर्शविलेले पाणीपुरवठा विभागाच्या कामासाठी असलेले आपलेच आरक्षण हटविण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठी महासभेत मंजूर केलेल्या ठरावानुसार बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रानजीक असलेले आरक्षण हटविण्यासाठी महापालिकेने शुक्रवारी (दि.१५) अधिसूचना काढली आहे.महापालिकेच्या २०१७ मध्ये मंजूर झालेल्या विकास आराखड्यात मौजे नाशिक शिवारात बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रानजीक हे आरक्षण ठेवण्यात आले होते. सिद्धार्थनगर झोपडपट्टीच्या समोर हा भूखंड आहे. यापूर्वी त्यावर महाराष्टÑ पोलीस अकादमीचे आरक्षण होते आणि आताही ते कायम असले तरी त्यातील काही क्षेत्र हे महापालिकेसाठी आरक्षित केले होते. शहरासाठी लागणाऱ्या दीर्घकालीन पाणीपुरवठा योजनेसाठी या जागेवर आरक्षण ठेवण्यात आले होते. मात्र महाराष्ट पोलीस अकादमीला त्याची कल्पना नव्हतीच, परंतु शहर विकास आराखड्याचे प्रारूप प्रसिद्ध केल्यानंतर आपल्या मिळकतीला धक्का बसतो आहे किंवा काय हे पाहण्याची तसदीही त्यांनी घेतली नाही. त्यामुळे आराखडा मंजूर झाला. परंतु त्याबाबत पुरेशी माहिती नसल्याने अकादमीने आपला विस्तारीत प्रकल्प राबविण्यासाठी या जागेवरच इमारत बांधायचे ठरवले. त्यासाठी महाराष्टÑ पोलीस हाउसिंगने निविदा मागवल्या आणि बांधकाम नकाशे मंजुरीसाठी महापालिकेत पाठविले तेथे हा प्रकार उघड झाला.यानंतर नगरविकास आणि गृहखाते मुख्यमंत्र्यांकडेच असल्याने त्यांनी मात्र अकादमीच्या बाजूनेच झुकते माप दिले आणि महापालिकेने लोकांच्या सुविधेसाठी असलेले आरक्षण हटविण्याची तयारी केली. हा प्रस्ताव मंजूर झाला असून, आता आरक्षण हटविण्यापूर्वी नागरिकांना हरकती आणि सूचना घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक