शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलन : अधिकाऱ्यांच्या गाड्यांची हवा सोडली

By admin | Updated: August 17, 2016 00:51 IST

प्रकल्पग्रस्तांच्या कश्यपी धरणात उड्या

नाशिक : कश्यपी धरणग्रस्तांना मोबदला व शासकीय नोकरीत सामावून घेण्याच्या प्रश्नावरून सोमवारी दुपारी धरणावर तीव्र आंदोलन करण्यात आले. पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू असतानाच दहा ते बारा तरुणांनी थेट पाण्याने गच्च भरलेल्या धरणातच जलसमाधी घेण्यासाठी उड्या मारल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. परिणामी संतप्त जमावाने शासकीय अधिकाऱ्यांची वाहने उलथविण्याचे तसेच हवा काढण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. कश्यपी धरणात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीचा पूर्ण मोबदला आणि कुटुंबातील एका सदस्याला महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रकल्पग्रस्त शासन दरबारी पाठपुरावा करीत असून, अनेक वेळा उपोषणे, मोर्चे, धरणे आंदोलनही करण्यात आले. परंतु आश्वासनापलीकडे काहीच हाती न लागल्याने सोमवारी स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर थेट धरणाच्या पाण्यातच जलसमाधी घेण्याचे आंदोलन छेडण्यात आले. सकाळपासूनच धरणाला लागून असलेल्या कश्यपीनगरात परिसरातील हजारो शेतकऱ्यांनी गर्दी केल्याने पोलिसांनीही बंदोबस्त वाढविला होता. प्रकल्पग्रस्तांची समजूत काढण्यासाठी पाटबंधारे खात्याचे अधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदारांनी धाव घेऊन त्यांना आंदोलन करण्यापासून परावृत्त करण्याबरोबरच सामंजस्याने प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. धरणाला लागूनच ही बैठक सुरू असताना अचानक एकनाथ बेंडकुळी, भगवान खाडे, सोमनाथ मोंढे अशा दहा ते बारा प्रकल्पग्रस्त तरुणांनी धरणावर धावत जाऊन थेट पाण्यात उड्या मारल्या. या घटनेमुळे बैठकीचा नूरच बदलून गेला. अचानक तणाव वाढून ज्यांनी पाण्यात उड्या मारल्या त्या तरुणांच्या नातेवाइकांनी धरणाकडे धाव घेतली. त्यांच्या पाठोपाठ अख्खा गावही धरणाकडे पळाल्याने त्यांच्या अटकावासाठी पोलीस बळही अपुरे पडले. कश्यपी धरण सध्या ९० टक्के भरले असून, पाण्यात उड्या मारणाऱ्या तरुणांचा जीव धोक्यात पडल्याचे पाहून जीवरक्षक दल तसेच गावातीलच काही तरुणांनीच पाण्यात उड्या घेत, जलसमाधी घेऊ पाहणाऱ्यांना बाहेर काढले. यातील सोमनाथ मोंढे या तरुणाला पोहता येत नसल्याने त्याला वाचविण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले. बेशुद्धावस्थेत त्याला बाहेर काढून तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेने बिथरलेल्या ग्रामस्थांनी शासकीय अधिकाऱ्यांनाच लक्ष्य करीत त्यांच्यावरच चाल करण्याचा प्रयत्न केला. त्यांची वाहने उलथवून टाकण्यासाठी जमाव प्रयत्नशील होताच, परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता गृहीत धरून आणखी पोलीस बळ मागविण्यात आले. पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यानच्या काळात आंदोलकांनी काही शासकीय वाहनांची हवाही सोडून दिली. दुपारी दोन वाजेपासून सुरू असलेला हा गोंधळ वाढत गेला. प्रकल्पग्रस्तांचे नेतृत्व करणारे हिरामण खोसकर यांचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसलेल्या या जमावाला कसेबसे शांत करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने बैठक घेण्याचे व तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (प्रतिनिधी)