शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2016 22:21 IST

चिंचोली शिवार : वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश

नायगाव : सिन्नर तालुक्यातील चिंचोली शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. विहिरीत जाळी टाकून बिबट्याला ओढण्यात आले. विहिरीच्या काठापर्यंत येताच बिबट्याने बाहेर उडी मारत डोंगराकडे धूम ठोकली.चिंचोली गावाच्या डोंगरालगत पंडित महादू सानप यांची वस्ती आहे. याच शिवारातील गट नं. १९७ मध्ये सानप यांच्या मालकीची ४० फूट खोल विहीर आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास सानप यांचा मुलगा दिलीप हा विद्युतपंप सुरू करण्यासाठी विहिरीकडे गेला होता. यावेळी दिलीप याला विहिरीतून बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज आल्याने त्याने विहिरीत डोकावले. विहिरीतील कपारीत बिबट्याने आश्रय घेतल्याचे त्याला दिसून आले. विहिरीत सुमारे २० फूट पाणी असल्याने पोहून दमलेला बिबट्या कपारीवर बसून मदतीच्या प्रतीक्षेत होता. दिलीप याने विहिरीत बिबट्या असल्याची बातमी ग्रामस्थांना दिल्याने घटनास्थळी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. पोलीसपाटील मोहन सांगळे यांनी सदर घटनेची माहिती सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप भामरे यांना फोनद्वारे कळवली. सिन्नर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर बोडके, आर.एम. सांगळे, अनिल साळवे, रवींद्र सोनार, वनरक्षक चंद्रकांत आव्हाड, राजाराम उगले, तुकाराम डावरे, ईश्वर पवार, पंढरीनाथ तांबे आदिंसह वनकर्मचाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. बिबट्या विहिरीत पडण्याच्या सातत्याने घडणाऱ्या घटना लक्षात घेऊन वनविभागाने बनविलेली विशेष सुती जाळी ग्रामस्थ व वनकर्मचाऱ्यांनी विहिरीत सोडली. तिच्या साहाय्याने बिबट्या बाहेर आला.(वार्ताहर)