वातावरणात गारवा : ढगाळ हवामानासह हलक्या सरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 07:21 PM2020-07-05T19:21:20+5:302020-07-05T19:40:46+5:30

रविवारी (दि.५) पहाटे शहरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सकाळी नाशिककरांना सूर्यदर्शन झाले नाही. सकाळपासून नभ दाटून आल्याने दिवसभर सुर्यप्रकाश गायब राहिला.

Light showers with cloudy weather! | वातावरणात गारवा : ढगाळ हवामानासह हलक्या सरी !

वातावरणात गारवा : ढगाळ हवामानासह हलक्या सरी !

Next
ठळक मुद्देशहरासह उपनगरांमध्ये अधुनमधून वर्षावशहरात वा-याचा वेग वाढल्याचे दिसून येत आहे

नाशिक : शहर व परिसरात रविवारी (दि.५) पहाटे पावसाच्या हलक्या सरी सुमारे अर्धा तास कोसळल्या. दिवसभर शहरात ढगाळ हवामान कायम राहिले तसेच शहराच्या मध्यवर्ती भागासह विविध उपनगरांमध्येही अधूनमधून हलक्या सरींचा वर्षाव झाला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर वा-याचा वेग वाढला असून दोन दिवसांपासून पाऊसही जोरदार सुरू आहे. यामुळे शहराच्या वातावरणावरही त्याचा प्रभाव दिसून येत आहे. पुढील दोन दिवस मुंबईत पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तविला गेला आहे. यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यातही पाऊस या पुढील दोन दिवसांत जोरदार हजेरी लावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शहरातदेखील वा-याचा वेग वाढल्याचे दिसून येत आहे.

रविवारी (दि.५) पहाटे शहरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सकाळी नाशिककरांना सूर्यदर्शन झाले नाही. सकाळपासून नभ दाटून आल्याने दिवसभर सुर्यप्रकाश गायब राहिला. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पुन्हा रिमझिम पावसाने काही भागात हजेरी लावली. मात्र, पुन्हा ऊन-सावल्यांचा खेळ सुर्यास्तापर्यंत शहरात पहावयास मिळाला. दरम्यान, पहाटे १.२ मिलीमीटर, तर सायंकाळी साडेपाचवाजेपर्यंत केवळ ०.६ मिलीमीटर पाऊस पेठरोडवरील हवामान निरिक्षक केंद्राकडून नोंदविला गेला. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शहरासह वडाळा, इंदिरानगर, जुनेनाशिक, द्वारका, उपनगर, आंबेडकरनगर या भागात दमदार सरींचा वर्षाव झाला मात्र वारा सुुटल्यामुळे सरी अल्पवेळच टिकू शकल्या. रविवारची सुटी आणि संध्याकाळनंतर संचारबंदी व जमावबंदी आदेशाची केली जाणारी काटेकोरपणे अंमलबजावणी यामुळे रस्त्यांवर फारशी वर्दळ पहावयास मिळाली नाही. रविवारची सुटी नाशिककरांनी आपआपल्या घरांमध्येच साजरी केली. एरवी पावसाळ्यात नाशिककर आठवडाभराचा क्षीण घालविण्यासाठक्ष त्र्यंबकेश्वर, गंगापूर, इगतपुरी या भागात पावसाळ्यात भटकंतीला पसंती देतात; मात्र यंदा कोरोनामुळे नागरिकांना वर्षा सहलीवर पाणी सोडावे लागत आहे, यामुळे काहीसा हिरमोडही अनेकांचा झाला.


- -

Web Title: Light showers with cloudy weather!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.