दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने इसमाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 15:02 IST2019-12-04T15:02:31+5:302019-12-04T15:02:39+5:30

वणी : कोकणगाव फाटा भागातील मोहाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कुर्णोली फाट्यावर दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात सुभाष विष्णू झोमन (५९) यांचा मृत्यू झाला.

 Isma's death due to missing bike control | दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने इसमाचा मृत्यू

दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने इसमाचा मृत्यू

वणी : कोकणगाव फाटा भागातील मोहाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कुर्णोली फाट्यावर दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात सुभाष विष्णू झोमन (५९) यांचा मृत्यू झाला. झोमन हे कुर्णोली ता दिंडोरी हे या भागातुन जात असताना दुचाकी खड्यात आदळली. त्यामुळे त्यांचे नियंत्रण सुटले व झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले व त्यांचा मृत्यु झाला.
मुलीचे अपहरण : आंबे दिंडोरी येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. अज्ञाताने अमिष दाखवुन फुस लावुन अपहरण केल्याच्या तक्र ारीवरु न अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टीव्ही गायब : दहेगाव येथील प्राथमिक शाळेतुन २५ हजाराचा टीव्ही अज्ञात इसमाने चोरु न नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या दरवाजाचे कुलुप व कडीकोयंडा तोडुन अज्ञाताने आत प्रवेश केला व टीव्ही चोरु न नेल्याची फिर्याद मुख्याध्यापक काशिनाथ किसन खुरकुटे यांनी दिली आहे.
दुचाकीची चोरी: वणी दिंडोरी रस्त्यावरील लॉन्समधुन १५ हजाराची दुचाकी अज्ञाताने चोरु न नेली. संजय शंकर पगार राहणार राजापुर ता दिंडोरी हे चन्द्रकला लॉन्स येथे विवाह सोहळ्यास गेले होते. तेथील पार्कीगंमधुन एमएच १५ बीएस १२२८ या क्र मांकाची दुचाकी चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत पोलिसांत तक्र ार देण्यात आली.

Web Title:  Isma's death due to missing bike control

टॅग्स :Nashikनाशिक