शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावी कांदा दरात सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 21:44 IST

लासलगाव : दोन दिवसांपूर्वी उतरलेले कांदा दर सोमवारी थोडेफार वाढल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्याला सोमवारी किमान १०००, कमाल ३८२५, तर सरासरी ३६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. आवक कमी झाल्याने दरात काही प्रमाणात सुधारणा झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्दे सोमवारी मिळालेल्या दराने कांदा उत्पादकांचा वांधा थोडाफार कमी

लासलगाव : दोन दिवसांपूर्वी उतरलेले कांदा दर सोमवारी थोडेफार वाढल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्याला सोमवारी किमान १०००, कमाल ३८२५, तर सरासरी ३६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. आवक कमी झाल्याने दरात काही प्रमाणात सुधारणा झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.मंगळवारी (दि. ८) दसरा सण असल्याने बाजार समितीला सुटी असून, कांदा व धान्य लिलाव बंद राहणार असल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.गत आठवड्यात कांद्याला ४२१ रुपयांची घसरण होऊन ३०२० रुपये सर्वाधिक दर जाहीर झाले होते. त्यामुळे कांदा उत्पादकात नाराजीचा सूर दिसून आला. मात्र, सोमवारी काहीप्रमाणात दर मिळाल्याने नाराजी कमी झलेली दिसून आली. देशांतर्गत किरकोळ बाजारात कांद्याचे वाढते बाजारभाव कमी व्हावे, यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केली. तसेच बाजार समितीमधील होलसेल व्यापाºयावर कांदा साठ्यावर ५०० क्विंटल, तर किरकोळ व्यापाºयावर १०० क्विंटलपर्यंत साठवणूक करण्याची मर्यादा आणली आहे. या निर्णयामुळे व्यापाºयांमध्ये नाराजी पसरली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांनंतर यंदा कांद्याला चांगले दर मिळत असताना केंद्र सरकारने निवडणुकीच्या तोंडावर घाईगर्दीत निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र, सोमवारी मिळालेल्या दराने कांदा उत्पादकांचा वांधा थोडाफार कमी झाल्याने त्यांच्या चेहºयावर हसू उमटले.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा