शहरं
Join us  
Trending Stories
1
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
2
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
3
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
4
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
5
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
6
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
9
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
10
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
11
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
12
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
13
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
14
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
15
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
16
Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज
17
Apple च्या CEO पदी नियुक्ती; कोण आहेत जॉन टर्नस? टिम कुक यांची जागा घेणार...
18
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
19
Mamata Banerjee : "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!
Daily Top 2Weekly Top 5

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 12:02 IST

Ashok Kharat : भोंदू अशोक खरात याच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाईचा वेग वाढवला असून, त्याच्या बेनामी संपत्तीवर टाच आणण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली जात आहेत.

दिनेश पाठक 

नाशिक : भोंदू अशोक खरात याच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाईचा वेग वाढवला असून, त्याच्या बेनामी संपत्तीवर टाच आणण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. प्राथमिक तपासात बेकायदेशीर मार्गाने मिळवलेली मालमत्ता तात्पुरती जप्त (प्रोव्हिजनल अटॅचमेंट) करण्याची प्रक्रिया 'ईडी'कडून राबवली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

पुढील टप्प्यात खरात यास समन्स बजावून चौकशी, बैंक खात्यांची तपासणी, आर्थिक देवाणघेवाणीचे विश्लेषण आणि आवश्यकता असल्यास अटकेची कारवाईही केली जाऊ शकते. त्यामुळे एसआयटीकडून ईडीकडे खरातचा ताबा काही दिवसांपुरता जाऊ शकतो. त्यासाठी ईडी न्यायालयाची परवानगी मागणार आहे. सध्या खरात पाचव्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत आहे. खरातची किमान १५ ते १७ हजार कोटींची संपत्ती असल्याचा अंदाज आहे. यात कोट्यवधीची बेनामी मालमत्ता आहे. 

"...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती

ईडीकडून एक स्वतंत्र गुन्हा खरातवर अगोदरच दाखल झालेला आहे. त्यानंतर त्याच्या घरासह कार्यालयावर ईडीने धाड टाकली होती. या चौकशीत खरातचे प्रॉपर्टी रॅकेट समोर आले होते. त्यात आता खरातशी संबंधित शासनातील काही अधिकारी, खासगी ब्रोकर, पुणे व नाशिकमधील काही विकासक रडारवर आहेत. नाशिक-अहिल्यानगर-पुणे यादरम्यानचे खरातचे प्रॉपर्टी रॅकेट उघड झाल्यानंतर सोलापूरमध्ये देखील खरातने जमीन लाटल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर ईडीकडून अत्यंत सावध पावले उचलली जात असून पहिल्या टप्प्यात खरातचे बँक खाते तात्पुरते सील करण्यात आले.

 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक

खरातच्या अनेक प्रॉपर्टीची कच्ची नोंद आढळून आली होती. नाशिकमधील खरातच्या निवासस्थानी ईडीच्या पथकाने सुमारे १४ तास सखोल झडती घेतली होती. या कारवाईदरम्यान विविध मालमत्तांशी संबंधित कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांच्या नोंदी आणि इतर महत्त्वाची माहिती जप्त करण्यात आली. तसेच खरातच्या कार्यालयावरही छापा टाकून व्हिजिटर बुकसह काही संवेदनशील कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. 

औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती

सध्या जप्त केलेल्या कागदपत्रांची तपशीलवार छाननी सुरू असून आर्थिक व्यवहारांची साखळी (मनी ट्रेल) शोधण्याचे काम ईडीकडून करण्यात येत आहे. संशयित व्यवहारांमधून मिळालेल्या संपत्तीचे मोजमाप करून त्याचा सविस्तर अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर ईडीकडून न्यायालयात खटला दाखल केला जाईल. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेनुसार संबंधित संपत्ती कायमस्वरूपी जप्त करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. खरातकडून मनी लॉड्रिंगचा संशय वाढल्याने ईडी 'पीएमएलए 'अंतर्गत स्वतंत्र चौकशी सुरू करण्यात आली आहे.

भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला

अशी होणार खरात कुटुंबियांची अडचण

ईडीने खरातच्या एखाद्या मालमत्तेवर तात्पुरती टाच (प्रोव्हिजनल अटॅचमेंट) आणल्यास त्या मालमत्तेबाबत अनेक व्यवहारांवर निबंध येतील. अशा परिस्थितीत संबंधित मालमत्ता खरात जरी तुरुंगात असला तरी त्याच्या कुटुंबातील वारसदारास अन्य कोणालाही विकता येणार नाही तसेच दुसऱ्याच्या नावावर हस्तांतरण, गिफ्ट किंवा वसीयतद्वारे बदल करणेही बंद होणार आहे. बँकेत कर्जासाठी खरात व त्याच्या पत्नीच्या नावावर असलेली मालमत्ता गहाण ठेवता येणार नाही. याशिवाय कागदपत्रांमध्ये फेरफार करणे किंवा मालमत्ता लपवण्याचे प्रयत्न केल्यास तो कायदेशीर गुन्हा ठरू शकतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Fraudster Ashok Kharat's Assets Face Attachment; Family to Face Hardship

Web Summary : ED intensifies action against Ashok Kharat for financial irregularities, initiating asset seizure. Properties can't be sold, transferred, or mortgaged, impacting his family. Authorities are investigating financial transactions and scrutinizing property dealings in Nashik, Pune, and Solapur. Further investigation will determine permanent seizure.
टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातCrime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस