महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा 'राजा शिवाजी' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात येत आहे. काल या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ऐतिहासिक चित्रपटाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून, रितेश-जिनिलियाच्या 'पॉवर कपल' भूमिकेची चर्चा आहे. ट्रेलर लाँच सोहळ्यात राजमाता जिजाऊंची भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धननं रितेश आणि जिनिलिया यांच्या सेटवरच्या केमिस्ट्रीबद्दल एक अतिशय गोड किस्सा शेअर केला, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'राजा शिवाजी'च्या भव्य ट्रेलर सोहळ्यात चित्रपटातील कलाकारांनी हजेरी लावली होती. ट्रेलर लाँचदरम्यान भाग्यश्री म्हणाली, "नवरा-बायकोने एकत्र दिग्दर्शक आणि निर्माती म्हणून काम करणं कठीण असतं. घरी गेल्यावर त्यांच्यात किती भांडणं झाली माहीत नाही, पण सेटवर कधीच वाद झाले नाहीत".
भाग्यश्रीने पुढे सेटवरील एक आठवण सांगितली. ती म्हणाली, "मला चांगलं आठवतंय, जिजाऊ जशा शिवरायांना जेवण भरवायच्या तसंच आमचा दिग्दर्शक (रितेश) कामात इतका व्यग्र होता की रात्र झाली होती आणि आमच्या सगळ्यांचं जेवण झालं होतं. पण तो शॉट सेटअप करण्यात व्यग्र होता. तेव्हा आमच्या निर्मात्या (जिनिलिया) एका ताटात पोळी-भाजी घेऊन त्याच्या मागे-मागे जात होती की निदान एक घास खा, त्यामुळे प्रेम असावं तर असं", अशा शब्दांत भाग्यश्रीने या जोडीचे कौतुक केले.
महाराष्ट्र दिनी होणार प्रदर्शितबहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'राजा शिवाजी' चित्रपट १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. विशेष म्हणजे 'राजा शिवाजी' सिनेमाचं लेखन, दिग्दर्शन रितेश देशमुखने केलं आहे. 'राजा शिवाजी'मध्ये रितेश देशमुखला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत आहे. तर जिनिलिया देशमुख महाराणी सईबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे.
Web Summary : Bhagyashree shared a sweet anecdote about Genelia's care for Riteish on the 'Raja Shivaji' set, highlighting their strong bond. The film releases May 1st.
Web Summary : भाग्यश्री ने 'राजा शिवाजी' के सेट पर जेनेलिया द्वारा रितेश की देखभाल का एक प्यारा किस्सा साझा किया, जो उनके मजबूत बंधन को दर्शाता है। फिल्म 1 मई को रिलीज हो रही है।