शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भोंदू अशोक खरातला ७ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायाधीशांच्या प्रश्नावर हात जोडून म्हणाला...! VC द्वारे करण्यात आलं होतं हजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 13:47 IST

खरेतर, खरातच्या दुसऱ्या एका गुन्ह्यासंदर्भात ही सुनावणी होती. पहिल्या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.


नाशिकमधील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी भोंदू अशोक खरात याची आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. आता न्यायालयाने त्याला ८ एप्रिलपर्यंत ७ दिवसांची पोलील कोठडी सुनावली आहे. एसआयटीने त्याला सुरक्षेच्या कारणाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केले होते. तत्पूर्वी, एसआयटीने सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयाकडे व्हीसीद्वारे सुनावणीसाठी अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने मंजूर केला होता. यानंतर, व्हीसीद्वारेच त्याची सुनावणी पार पडली. त्याला आज पाचव्यांदा न्यायालयासमोर (VC च्या माध्यमाने) हजर करण्यात आले होते. खरेतर, खरातच्या दुसऱ्या एका गुन्ह्यासंदर्भात ही सुनावणी होती. पहिल्या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

सुनावणीवेळी कोर्ट रूममध्ये तीन स्क्रीन -
सुनावणी दरम्यान, अशोक खरात प्रकरणातील तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी, तसेच सरकारी वकील ॲड. शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. सरकारी वकिलांनी खरातची ७ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. न्यायालयाने ती मंजुर केली. सुनावणीवेळी कोर्ट रूममध्ये तीन स्क्रीन लावण्यात आल्या होत्या. एका स्क्रीनमध्ये अशोक खरात होता. दुसऱ्या स्क्रीनमध्ये न्यायाधीश होते. तर तीन स्क्रीनवर प्रेक्षक होते. 

अशोक खरात हात जोडून म्हणाला 'नाही' -
सुनावणीला सुरूवात झाल्यानंतर, जेवढ्या वेळ सुनावणी सुरू होती तेवढ्याही वेळ खरातची मान खाली असल्याचेच दिसून आले. दरम्यान न्यायाधीशांनी अशोक खरात नाव विचारले. तेव्हा त्याचा आवाज फारच कमी आला. यावर न्यायाधीशांनी त्याला मोठ्याने  बोलण्यास सांगितले. यानंतर "भाटे वकील हे आपली बाजू मांडत आहेत, ते आपलेच वकील आहेत का?" असे न्यायालयाने विचारले असता, खरात "हो" म्हणाला. तसेच "आपल्याला काही बोलायचे आहे का? असे न्यायाधीशांनी विचारले असता, यावर अशोक खरातने हात जोडून "नाही", असे उत्तर दिले.

दरम्यान, अशोक खरातच्या या पोलीस कोठडीला त्याच्या वकिलाने विरोध केला. यासंदर्भात युक्तिवाद करताना आरोपीचे वकील म्हणाले, एवढ्या दिवसांच्या पोलीस कोठडीची आवश्यकता का आहे? कारण यापूर्वीही त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. हा आरोपीचा दुसरा गुन्हा आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Fake Guru Ashok Kharat Gets 7-Day Police Custody

Web Summary : Ashok Kharat, accused in a Nashik sexual assault case, received seven days of police custody after a video conference hearing. He appeared before the court for the fifth time, connected to a second offense. He said 'no' with folded hands when asked if he wanted to speak.
टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातCourtन्यायालयNashikनाशिक