शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
5
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
6
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
7
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
8
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
9
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
10
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
11
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
12
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
13
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
14
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
15
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
16
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
17
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
18
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
19
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
20
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीत आजी-माजी आमदारांचे वारसदार रिंगणात

By admin | Updated: February 7, 2017 01:41 IST

इगतपुरीत आजी-माजी आमदारांचे वारसदार रिंगणात

घोटी : इगतपुरी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ५ जागांसाठी ५७ तर पंचायत समितीच्या १० जागांसाठी १०१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. एकूण १५८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात आजी माजी आमदारांच्या वारसांनी तसेच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आजी माजी पदाधिका-यांनी आपल्या घरातील प्रतिनिधींचे अर्ज दाखल केल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे.  सोमवारी उमेदवारी दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी इगतपुरी तहसील आवारात चांगलीच गर्दी झाली होती. सर्वपक्षीयांनी तिकीट वाटप करून उशिरापर्यंत उमेदवारांची यादी अंतिम करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. निवडणुकीची प्रक्रि या निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अनिल पुरे पाहत आहेत. आज अंतिम दिवस असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची धावपळ होत होती अधिकारी, कर्मचारी यांची मात्र दमछाक झाली. शेवटच्या दिवशीच पाच गटांसाठी ५७ तर दहा गणांसाठी १०१ अर्ज दाखल झाले. जिल्हा परिषदेच्या ५ गटांमधील घोटी १३, शिरसाठे ७, वाडीव-हे ७ , खेड ११, नांदगांव सदो ७ अर्ज दाखल झाले आहेत. घोटी गटात सर्वाधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.जिल्हा परिषद पंचायत समतिीच्या निवडणुकीसाठी तालुक्यातील नेते व इच्छुकांनी उमेदवारी प्रतिष्ठेची केली आहे. तालुक्यातील आजी माजी आमदारांच्या कुटुंबातील व्यक्तींचा, दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. या निवडणुकीत बदलत्या आरक्षणाने युवकांना उमेदवारीची मिळालेली संधी यामुळे चुरस वाढल्याने तहसील आवारात विक्र मी गर्दी होती. राजकीय पक्षांचे उमेदवार निश्चित झाल्याने अधिकृत उमेदवारांनी अर्जासोबत एबी फॉर्मही दाखल केले. विद्यमान सभापती गोपाळ लहांगे यांच्या पत्नी अनिता लहांगे ( शिवसेना ), आमदार कन्या नयना गावित ( काँग्रेस ) माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्या पत्नी तथा एकलहरा गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सुशिला मेंगाळ ( शिवसेना ), पंचायत समिती सदस्य हरिदास लोहकरे ( शिवसेना ), माजी जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव ( राष्ट्रवादी ), शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव ( शिवसेना ), संदीप किर्वे (मनसे), संदीप शहाणे(भाजपा), मनोहर घोडे ( काँग्रेस ), वसंत डामसे ( भाजपा ), माजी सभापती कावजी ठाकरे ( शिवसेना ), युवा नेते राजू गांगड ( भाजपा ), माजी महसुल अधिकारी सोमनाथ ठोकळ ( शेकाप ), गणांमध्ये सेनेचे युवा नेते विठ्ठल लंगडे ( शिवसेना ), माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गाढवे यांच्या पत्नी ममता गाढवे ( राष्ट्रवादी ), माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन माळी यांच्या सुन लक्ष्मीबाई माळी, सहकार नेते रघुनाथ तोकडे यांच्या स्नुषा विमल तोकडे ( शिवसेना), पांडुरंग शिंदे यांच्या पत्नी विठाबाई शिंदे ( काँग्रेस ) या उमेदवारांनी रिंगणात उडी घेतल्याने निवडणुकीची चुरस वाढली आहे. (वार्ताहर)