शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
11
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
12
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
13
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
14
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
15
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
16
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
17
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
18
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
20
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 

हिना पांचालला नकोय लॉकअपचे भोजन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2021 12:58 AM

इगतपुरीच्या रेव्ह पार्टीत अंमलीपदार्थांचे सेवन करताना आढळून आलेल्या २२ व्यक्तींपैकी एक असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री हिना पांचालचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला आहे. दरम्यान, लॉकअपमध्ये सर्वसामान्यांना मिळणारे भोजन तिला पटेनासे झाले असून, तिच्याकडून वेस्टर्न फूडचीही मागणी केली गेल्याची चर्चा होत  आहे.  

ठळक मुद्दे ‘वेस्टर्न फूड’ची मागणी केल्याची रंगतेय चर्चा

नाशिक : इगतपुरीच्या रेव्ह पार्टीत अंमलीपदार्थांचे सेवन करताना आढळून आलेल्या २२ व्यक्तींपैकी एक असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री हिना पांचालचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला आहे. दरम्यान, लॉकअपमध्ये सर्वसामान्यांना मिळणारे भोजन तिला पटेनासे झाले असून, तिच्याकडून वेस्टर्न फूडचीही मागणी केली गेल्याची चर्चा होत  आहे.  इगतपुरीतील दोन आलिशान बंगल्यांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीवर अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी मिळालेल्या माहितीवरून पोलिसांचा फौजफाटा घेत छापा टाकला. यावेळी अत्यंत तोकड्या कपड्यांमध्ये येथे बारा तरुणी, दहा तरुण अंमलीपदार्थांची नशा करताना आढळून आले. न्यायालयाने सुरुवातील पांचालला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती; मात्र मंगळवारी पुन्हा न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता पांचालकडून करण्यात आलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावत पोलीस काेठडी ५ जुलैपर्यंत वाढविली. यामुळे पांचालचा कोठडीतील मुक्काम वाढला. जेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हिनाची चौकशी सुरू केली तेव्हा पोलीस ठाण्यात तिने चंदेरी दुनियेत याचे फारसे अप्रूप वाटत नाही, अशाप्रकारची मौजमजा ही अगदी सामान्य बाब (नॉर्मल) असल्याचे सांगितले. हे ऐकून पोलिसांनाही आश्चर्याचा धक्काच बसला. दरम्यान, एका अधिकाऱ्याने हे नाशिकमध्ये चालणार नाही, हे लक्षात घ्या, असेही तिला बजावून सांगितल्याची चर्चा आहे.पोलीस कोठडीत असलेल्या १२ महिलांसह अन्य सर्व पुरुषांच्या मुक्कामाची ‘तजवीज’ शहरातील वाडीवऱ्हे, पिंपळगाव बसवंत, ओझर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आदी भागातील पोलीस ठाण्यांमधील लॉकअपमध्ये करण्यात आली आहे. दरम्यान, वरीलपैकी एका लॉकअपमध्ये आपल्या मैत्रिणींसोबत असलेल्या हिनाकडून भोजनासाठी सेलिब्रिटी लाइफस्टाइलनुसार पश्चिमात्य खाद्यपदार्थ मिळण्याची विनंतीवजा मागणी पुढे आल्याची चर्चा आहे. पोलिसांनी तिची ही मागणी मात्र फेटाळून लावत ‘जे सर्वांना भोजन दिले जाते, तेच तुम्हालाही मिळेल’, असे ठणकावून सांगितले. 

टॅग्स :NashikनाशिकHeena Panchalहिना पांचाळCrime Newsगुन्हेगारी