शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

तर इमारती ठरतील काचेची कब्रस्ताने

By admin | Updated: July 22, 2014 00:55 IST

तर इमारती ठरतील काचेची कब्रस्ताने

मुंबईच्या आगीचा धडा : नियमाच्या अंमलबजावणीबाबत संभ्रम; शहरातही वाढतेय फॅडनाशिक : उंच उंच इमारती विशेषत: व्यापारी संकुलांना दर्शनी भागात चकचकीत काचा लावण्याचे फॅड कसे जीवाशी बेतते हे गेल्या आठवड्यात मुंबईत लागलेल्या आगीच्या घटनेनंतर लक्षात आले आहे. तथापि, नाशिकमध्ये अशाप्रकारच्या काचांचे वेड वाढत असून, कोणत्याही नियम निकषाशिवाय सर्रासपणे त्यांचा वापर होत आहे. काचा वापरण्याचे नियम नाही अशातला भाग नाही, परंतु त्याची अंमलबजावणी कोणी करावी, असा प्रश्न असल्याने काचा लावलेल्या अनेक इमारती धोकादायक ठरत आहेत.गेल्या आठवड्यात मुंबई येथील अंधेरी भागात लोटस या प्रकल्पाला आग लागली. या दुर्घटनेत अग्निशमन दलाचा एक जवान शहीद झाला, तर २० नागरिक जखमी झाले. मुंबईसारख्या शहरात सुविधा असल्याने तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरमुळे ३२ जणांचे प्राण वाचले हे खरे असले तरी इमारतीला शोभेसाठी लावलेल्या काचा आगीमुळे तडकल्या आणि त्यामुळेच अनेक जण जखमी झाले. साहजिकच अशा काचांच्या उपयुक्ततेविषयी आणि सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिकमध्येही सध्या व्यापारी संकुलांना अशा प्रकारच्या काचा बसविण्याचे फॅड वाढत आहे. काचांमुळे इमारती आकर्षक दिसत असल्या तरी त्याचा धोका अधोरेखित झाला आहे. अशा प्रकारच्या काचांमुळे नाशिकसारख्या ठिकाणी उन्हाळ्यात वातावरण तापण्यास अधिकच मदत होत असून, त्याचा परिणाम गेल्या काही वर्षांत दिसू लागला आहे. त्यातच आगीच्या या दुर्घटनेमुळे वापरावरील नियंत्रणाचादेखील विचार होऊ लागला आहे.सद्यस्थितीत नगररचना विभागात काचांना प्रतिबंध करणारा असा कोणताही कायदा नाही, असे नगररचना विभागाचे म्हणणे आहे, तर नॅशनल बिल्डिंग कोडमध्ये इमारतीच्या सर्वच रचनांचा ऊहापोह झाला असून, त्यात काचांचा वापर कसा करावा याचादेखील उल्लेख आहे. परंतु त्याची अंमलबजावणी होतेच असे नाही, अर्थात बिल्डिंग कोडमध्ये विद्युत, विकास नियंत्रण नियमावली अशा विविध प्रकारचे निकष संबंधितांनी बघितले पाहिजे, असे त्यात अपेक्षित असल्याचे अग्निशमन दलाचे म्हणणे आहे. मुळात काचांचा वापर करणे ही पाश्चात्य पद्धती आहे. तेथील वातावरणाचा विचार करताना इमारतीत उजेड रहावा यासाठी काचांचा वापर होत असला तरी आपल्याकडे त्याचे सर्रास अनुकरण होत आहे. मुंबईच्या आगीच्या प्रकरणातून धडा न घेतल्यास नाशिकमध्ये अशी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)