शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

वणी-सापुतारा महामार्गावर लूटमार करणाºया टोळीचा म्होरक्या गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 20:43 IST

वणी-सापूतारा महामार्गावर लूटमार करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत लूटमार करणाऱ्या टोळीचा म्होरक्या हरिश्चंद्र शेवरे याच्याकडून ३ जिवंत काडतुसे व मोबाइल फोन असा मुद्देमाल जप्त केला आहे. 

ठळक मुद्देसाथीदारांच्या मदतीने वणी सापूतारा रस्त्यावर लुट लुटमार करणाऱ्या टोळीचा म्होरक्या गजाआड

नाशिक : वणी-सापूतारा महामार्गावर लूटमार करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत लूटमार करणाऱ्या टोळीचा म्होरक्या हरिश्चंद्र शेवरे याच्याकडून ३ जिवंत काडतुसे व मोबाइल फोन असा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोरी तालुक्यातील खुंटीचा पाडा येथील रहिवासी जीवन गायकवाड हे त्यांचेकडील मारुती सेलेरिओ कारने घरी जात असताना वनारे फाटा परिसरात दि. १९ नोव्हेंबर २०१९ रोजी मध्यरात्रीचे सुमारास अज्ञात चार जणांनी त्यांच्या कारला मोटारसायकली आडव्या लावून हॉकी स्टीकने पायावर व अंगावर बेदम मारहाण करून कारसह लॅपटॉप व मोबाइल असा एकूण २ लाख ३० हजार रुपये किमतीचा ऐवज लुटून नेला होता. त्यानंतर लुटलेली कार पेट्रोल भरण्यासाठी गोळशी फाटा परिसरातील आरती पेट्रोलपंपावर आणली. त्या ठिकाणीही पेट्रोलपंपावरील व्यक्तींना पिस्तूलचा धाक दाखवत लाकडी दांड्याने मारहाण करून ५००० रुपयांची रक्कम जबरीने लुटून नेली होती. या दोन्ही घटनांबाबत वणी व दिंडोरी पोलीस ठाण्यांमध्ये जबरी लुटमारीचे गुन्हे दाखल होते. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही घटनास्थळांना भेट देऊन अज्ञात आरोपींचे पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संशयितांचे वर्णनाशी साम्य असलेले गुन्हेगारांची पडताळणी करून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि.४) पेठ रोडवर गोळशी शिवारात सराईत गुन्हेगार दिंडोरीतील वाळुंजे येथील हरिश्चंद्र कचरू शेवरे (३१) याला रात्रभर सापळा रचून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुजरात राज्यातील त्याचे साथीदार ब्रिजेश सोमदेव राय व दीपक मराठे आणि दिंडोरीतील वारे येथील बाळू तुकाराम पानडगळे व देवीदास सुरेश पानडगळे यांच्यासह वणी-सापूतारा महामार्गासह गुजरातमध्येही अशाप्रकारच्या लुटमारीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसRobberyचोरीThiefचोर