शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भांडवली कामांसाठी निधीची चणचण

By admin | Updated: September 11, 2016 02:02 IST

मनपा पेचात : एलबीटीपोटी ३५० कोटी उत्पन्न जमा

नाशिक : महापालिकेचे सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी महासभेने १७६१ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर केले असले तरी आता त्यातील तरतुदींची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे उभे ठाकले आहे. गेल्या पाच महिन्यांत महापालिकेला एलबीटीपोटी ३५९ कोटी रुपये उत्पन्न प्राप्त झाले असून, वर्षअखेर उत्पन्न ८५० कोटी रुपयांच्या आसपास मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भांडवली कामांसाठी निधी उपलब्ध होईल की नाही, याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. परिणामी, यंदाही विकासकामे रखडण्याची भीती आहे.महापालिकेची एकूणच खालावलेली आर्थिक स्थिती लक्षात घेता महासभेने यंदाच्या अंदाजपत्रकात केवळ २३.५५ कोटी रुपयांची अल्पशी वाढ सुचविणे पसंत केले आहे. डॉ. प्रवीण गेडाम यांनी आपल्या आयुक्तपदाच्या कारकीर्दीतील दुसरे अंदाजपत्रक सादर करताना जमा आणि खर्च बाजूचा विचार करत १३५७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायीला सुपूर्द केले होते. त्यात महापालिकेचा बंधनात्मक खर्च ७८३ कोटी रुपये, सिंहस्थ कामांसाठी महापालिकेचा हिस्सा २० कोटी, जे.एन.एन.यू.आर.एम. प्रकल्पासाठी ७६ कोटी, मुकणे धरणातील थेट पाइपलाइनसाठी ५० कोटी, जमीन संपादनाकरिता मनपाचा निधी ५० कोटी, १९ टक्के राखीव निधी ६१.६५ कोटी आहे.