शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाकडून रॅकेट उद्धवस्त : पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यासह तस्कर टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 13:37 IST

ठाणे येथील संशयित सहा.पोलीस निरिक्षक विश्वास बाळासाहेब चव्हाणके (नेमणूक रबाळे पोलीस ठाणे), व पुणे येथील चतुश्रृंगी पोलीस ठाण्यातील रायटर दिपक गोवर्धन धाबेकर यांच्यासह तस्करीच्या गुन्ह्यात

ठळक मुद्देदोन पोलीसांसह १७ तस्करांच्या बांधल्या मुसक्याअंधश्रध्दा वन्यप्राण्यांच्या जीवावर

नाशिक : गुप्तधन प्राप्ती हवी असेल तर मांडूळ आणि घरात पैशांचा पाऊस पाडायचा असेल तर कासवाची पूजाविधी करा, या पसरलेल्या अंधश्रध्देमुळे वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात येत आहे. वन्यजीवांच्या तस्करीचे मोठे रॅकेट नाशिक पुर्व वनविभागाच्या येवला रेंज आणि फिरते दक्षता पथकाने उदध्वस्त केले. नाशिक, ठाणे, अहमदनगर,पुणे जिल्ह्यातून एक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यासह १७ तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश केला. या टोळीकडून एक मांडूळ व एक मऊ पाठीचे कासव आणि गुन्ह्यात वापरलेल्या महागड्या चारचाकी, दुचाकी वाहने जप्त करऱ्यात आल्याची माहिती उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी सोमवारी (दि.१५) दिली.

नाशिक जिल्ह्यातील येवला वनपरिक्षेत्रांतर्गत सत्यगाव या खेडेगावात घरामध्ये मांडूळ दडवून ठेवल्याची गोपनीय बातमी वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांना मिळाली. त्या माहितीच्याअधारे त्यांनी वनपाल, वनरक्षकांच्या पथकासह संबंधिताच्या घरावर छापा मारून मांडूळसह संशयित आरोपी सोमनाथ रामनाथ पवार (२२) यास ताब्यात घेतले. न्यायालयाकडून त्याची वनकोठडी मिळविल्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी केली असता वनविभागाच्या पथकाला महत्त्वाचे धागेदोरे हाती आले आणि गुन्ह्याची तीव्रता व व्याप्ती मोठी असल्याची खात्री पटली. सहायक वनसंरक्षक सुजीत नेवसे यांनी याप्रकरणी पथकाला मार्गदर्शन करत या गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाऊन तस्करांची टोळी गजाआड करण्याचा ह्यटास्कह्ण दिला. त्यानुसार भंडारी, दक्षता पथकाचे वनक्षेत्रपाल बशीर शेख यांच्या नेतृत्वाखाली दोन स्वतंत्र पथके कार्यान्वित करण्यात आली. मिळालेले धागेदोरे तपासत पथकांनी सापळे रचण्यास सुरूवात केली. वडाळीभोई येथून सोमनाथचे नातेवाईक प्रकाश बर्डे, संदीप बर्डे यांना अटक केली. यांच्या सांगण्यावरून सोमनाथने मांडूळचा शोध घेत तो पकडला होता. या मांडूळाची विक्री देवळाली कॅम्प भागातील अंबादास बापु कुवर व थेरगावातील धर्मा देवराम जाधव यांना मांडूळ खरेदी करावयाचा असल्याने पथकाने त्यांनाही संशयावरून ताब्यात घेतले. या दोघांची वनविभागाच्या पथकाने कसून चौकशी केली असता त्यांनी सिन्नर तालुक्यातील म-हळ गावातील संशयित संतोष बाळकिसन कचोळे व मनेगावाती किरण पांडुरंग सोनवणे यांची नावे सांगितली.पथकाने त्यांनाही ४ जून रोजी अटक केली. येवला न्यायालयाकडून त्यांची वनकोठडी घेतल्यानंतर तपासी पथकाकडून त्यांची कसून चौकशी केली गेली आणि धक्कादायक माहिती समोर आली.
एकूणच वन्यजीव तस्करीमध्ये नाशिक पुर्व वनविभागाला मोठे यश मिळाले असून ठाणे येथील संशयित सहा.पोलीस निरिक्षक विश्वास बाळासाहेब चव्हाणके (नेमणूक रबाळे पोलीस ठाणे), व पुणे येथील चतुश्रृंगी पोलीस ठाण्यातील रायटर दिपक गोवर्धन धाबेकर यांच्यासह तस्करीच्या गुन्ह्यात सहभाागी संशयित ज्ञानेश्वर विठ्ठलराव वाबळे व निखिल निवृत्ती गायकवाड (रा.कोल्हार) नीलेश रामदास चौधरी (रा.चाकण), संदीप तान्हाजी साबळे (रा.नारायणगाव), महेश हरिश्चंद्र बने (रा.अंबरनाथ), याच्या मुसक्या बांधल्या.एकूण 19 संशयित आरोपींना वनविभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या.

 

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागwildlifeवन्यजीवArrestअटकCrime Newsगुन्हेगारी