शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

फुलणार कमळ की फिरणार काटे?

By admin | Updated: September 16, 2014 00:23 IST

फुलणार कमळ की फिरणार काटे?

मनसेत ढिकलेंना पर्याय कोण?  स्थायी समिती सभापतिपद आणि पक्षाचा शहराध्यक्ष अशी दुहेरी जबाबदारी पार पाडताना अ‍ॅड. राहुल ढिकलेंचा कस लागलेला असताना, आता पुन्हा नव्याने आमदारकीसाठी कुटुंबातच तिकीट मिळाले तर पक्षांतर्गतच गटबाजी वाढण्याची चिन्हे पाहता ढिकले कुटुंबीयांनी निवडणूक न लढविण्याचे संकेत दिले आहेत.विद्यमान आमदार अ‍ॅड. उत्तमराव ढिकलेच उमेदवारीसाठी नाही म्हणत असल्याने मनसेकडून माजी स्थायी समिती सभापती रमेश धोंगडे किंवा गटनेते अशोक सातभाई यांच्यापैकी एकाला उमेदवारीची लॉटरी लागू शकते. पूर्वमधून निवडणूक लढविण्यास मनसेकडून तसे फारसे कोणी इच्छुक असेल असे वाटत नाही. आता अशोक मुर्तडकही महापौर झाल्याने तर मनसेला उमेदवारासाठी धावाधाव करावी लागण्याची चिन्हे आहेत.मनसेत ढिकलेंना पर्याय कोण?४स्थायी समिती सभापतिपद आणि पक्षाचा शहराध्यक्ष अशी दुहेरी जबाबदारी पार पाडताना अ‍ॅड. राहुल ढिकलेंचा कस लागलेला असताना, आता पुन्हा नव्याने आमदारकीसाठी कुटुंबातच तिकीट मिळाले तर पक्षांतर्गतच गटबाजी वाढण्याची चिन्हे पाहता ढिकले कुटुंबीयांनी निवडणूक न लढविण्याचे संकेत दिले आहेत.विद्यमान आमदार अ‍ॅड. उत्तमराव ढिकलेच उमेदवारीसाठी नाही म्हणत असल्याने मनसेकडून माजी स्थायी समिती सभापती रमेश धोंगडे किंवा गटनेते अशोक सातभाई यांच्यापैकी एकाला उमेदवारीची लॉटरी लागू शकते. पूर्वमधून निवडणूक लढविण्यास मनसेकडून तसे फारसे कोणी इच्छुक असेल असे वाटत नाही. आता अशोक मुर्तडकही महापौर झाल्याने तर मनसेला उमेदवारासाठी धावाधाव करावी लागण्याची चिन्हे आहेत.राष्ट्रवादीत चुरस कमीचनवीन समीकरणांमध्ये आता पूर्व मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता वाढल्याने माजी खासदार व विद्यमान नासाका व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांनी मागील वेळेची चूक टाळत वरिष्ठांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. तसेच ते लोकसभेला पालकमंत्र्यांच्या प्रचारासाठी आधीपासूनच कामाला लागले होते. मनोहर बोराडे हेसुद्धा पूर्वमधून इच्छुुक आहेत. मागील वेळीही पिंगळे व बोेराडे या दोघांनीही उमेदवारी केली होती. माजी शहराध्यक्ष शरद कोशिरे यांचे नाव घेतले जात होते; मात्र ते आता मागे पडल्याचे चित्र आहे. तसेच समता परिषदेचे राज्य पदाधिकारी आणि पालकमंत्र्यांचे समर्थक दिलीप खैरे यांचे नाव आघाडीवर असले, तरी शेवटी पालकमंत्री कोणाच्या पारड्यात मत टाकतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.भाजपाकडे इच्छुकांची रांगलोकसभेत मोदी लाटेचा प्रभाव पाहून पंचवटीतून अर्थात पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपाकडे इच्छुकांची भलीमोठी रांग लागली आहे. मागील वेळी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या बाळासाहेब सानप यांच्यासह देवयानी फरांदे, सुनील केदार, अरुण पवार यांच्यासह सुनील आडके, संभाजी मोरूस्कर अशी भली मोठी यादी आहे. त्यातही दोघा-तिघांच्या नावावर पक्षाच्या नेत्यांकडून चर्चा सुरू असली, तरी ऐनवेळी पक्षात प्रवेश करणाऱ्यांनाही संधी देणार काय, हाच खरा प्रश्न आहे. कारण शैक्षणिक संस्थेत प्रतिनिधित्व करताना अचानक आमदारकीचे डोहाळे काहींना लागले असून, त्यांनीही उमेदवारीचा चंग बांधला आहे. असे झालेच तर सानपांची अडचण होऊ शकते. तिसरा पर्याय कमकुवतचझोपडपट्टी परिसराचा सर्वाधिक समावेश असलेल्या पूर्व विधानसभा मतदारसंघात माकपसह बसपा, सपा यांचे असित्व नावापुरतेच उरले आहे. पूर्व विधानसभा मतदारसंघात मध्यमवर्गीयांची संख्याही लक्षणीय आहे. माकपसह बसपा व सपाच्या वतीने उमेदवाराची शोधाशोध सुरू असली, तरी ऐनवेळी दुसऱ्या पक्षातून बाहेर पडलेला एखादा सक्षम उमेदवार मिळाल्यावर त्याच्याच गळ्यात उमेदवारीची माळ घालण्याची तयारी या पक्षांकडून केली जाऊ शकते. त्या तुलनेने बसपाच्या शहराध्यक्षपदी नव्यानेच निवड झालेल्या मुकुंद गांगुर्डेंची बसपाकडून पूर्वमधून उमेदवारीची चर्चा सुरू असून, ती अंतिम टप्प्यात असल्याचे बोलले जात आहे.