राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून ‘द लास्ट व्हाईसरॉय’ प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 02:47 PM2019-12-03T14:47:21+5:302019-12-03T14:56:04+5:30

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून अथर्व ड्रॅमॅटिक्स अ‍ॅकेडमीच्या द लास्ट व ‘द लास्ट व्हाईसरॉय’ या नाटकाने प्रथम तर ओझर येथील एच ए ई ड ब्ल्यू आर सी रंगशाखेच ‘प्रार्थनासूक्त’ नाटकाने द्वितीय पारितोषिक  पटकावले असून   नाटयसेवा थिएटर्सच्या ‘साधे आहे इतकेच’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक मिळाले आहे.

First 'The Last Viceroy' from Nashik Center at the State Amateur Marathi Drama Contest | राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून ‘द लास्ट व्हाईसरॉय’ प्रथम

राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून ‘द लास्ट व्हाईसरॉय’ प्रथम

googlenewsNext
ठळक मुद्दे राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे निकाल जाहीर ‘द लास्ट व्हाईसरॉय’ व ‘प्रार्थनासुक्त’ची अंतीम फेरीसाठी निवड

नाशिक  : ५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून अथर्व ड्रॅमॅटिक्स अ‍ॅकेडमीच्या द लास्ट व ‘द लास्ट व्हाईसरॉय’ या नाटकाने प्रथम तर ओझर येथील एच ए ई ड ब्ल्यू आर सी रंगशाखेच ‘प्रार्थनासूक्त’ नाटकाने द्वितीय पारितोषिक  पटकावले असून  या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड आल्याची याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने मंगळवारी (दि.३) प्रसिध्दीपत्रद्वारे केली. 
नाशिक शहरातील परशूराम साईखेडकर नाट्यगृहात १५ नोेव्हेंबर ते १ डिसेंबर या कालवधीत जल्लोषात पार पडलेल्या  ५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत एकूण १८ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिकच्या नाटयसेवा थिएटर्सच्या ‘साधे आहे इतकेच’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक मिळाले आहे. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून  शाम अधटराव, संदीप देशपांडे आणि किर्ती मानेगांवकर यांनी काम पाहिले. त्यांनी केलेल्या स्पर्धेच्या निरीक्षनातून द लास्टव्हाईसरॉय नाटकातील कलाकार अक्षय मुडवदकर व पूनम पाटील यांना उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्यपदक देण्यासोबतच अन्य नाटकांमध्ये आपल्या अभिनयाची चमक दाखवून देण्याऱ्या कलाकारांना गुणवत्ता प्रमाणपत्रे देण्याचा निर्णय परीक्षकांनी घेतला आहे. यात पूनम देशमुख (साधे आहे इतकेच), डॉ. प्राजक्ता भांबारे (भोवरा), मनिषा शिरसाट (काठपदर), भावना कुलकर्णी (प्रेमा तुझा रंग कसा), पल्लवी ओढेकर (कहानी में ट्वीस्ट), समाधना मूर्तडक (अरे देवा), संदेश सावंत (प्रार्थनासुक्त), विक्रम गवांदे ( वारुळ), आदित्य भोंम्बे (साधे आहे इतकेच), कुंतक गायधनी (अंधायुग) या कलाकारांचा समावेश आहे.

प्राथमिक फेरीचे निकाल 
दिग्दर्शन -

प्रथम  - महेश डोकरोदे (नाट्य-द लास्ट व्हाईसराय),
द्वीतीय - हेमंत सराफ (नाटय-प्रार्थनासुक्त)
प्रकाश योजना-
प्रथम -कृतार्थ कंसारा ( द लास्टव्हाईसरॉय), 
द्वीतीय -आकाश पाठक (प्रार्थनासुक्त)
नेपथ्य -
प्रथम- मंगेश परमार (नाटक-द लास्ट व्हाईसरॉय),
द्वीतीय- गणेश सोनावणे (नाटक काठपदर)
रंगभूषा -
प्रथम - माणिक कानडे (द लान्ट व्हाईसराॉय)
द्वीतीय- सुरेश भोईर    (नाटक-ड्रीम युनिवर्स)
 

Web Title: First 'The Last Viceroy' from Nashik Center at the State Amateur Marathi Drama Contest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.