शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक वसाहतीत अग्निशमन सेवा सुरू होणार

By admin | Updated: November 17, 2016 22:21 IST

अंबड येथे सुविधा : आयमाच्या प्रयत्नांना यश

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या अनेक कंपन्यांना मोठ्या आगी लागून उद्योजकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याने अंबड इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या (आयमा) वतीने अंबड औद्योगिक वसाहतीत अग्निशमन सेवा सुरू करण्याची वारंवार मागणी करण्यात आली होती. या मागणीच्या पाठपुराव्याला यश आले असून, लवकरच अंबड औद्योगिक वसाहतीत अग्निशमन सेवा सुरू होणार आहे.उद्योजकांचे होणारे नुकसान टाळता यावे यासाठी गेल्या दहा वर्षांपासून येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे व जिल्हा उद्योगमित्र केंद्राच्या बैठकीत वारंवार याप्रश्नी मुद्दा उपस्थित करून सतत पाठपुरावा केला होता. परंतु अग्निशमन केंद्राच्या इमारतीचे बांधकाम झाले नसल्यामुळे अग्निशमन केंद्र सुरू झाले नव्हते. या जागेवर अग्निशमन केंद्राच्या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात यावे व अग्निशमन सेवा सुरू व्हावी यासाठी आयमाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांच्या नेतृत्वाखाली आयमाच्या शिष्टमंडळाने एमआयडीच्या अधिकाऱ्यांशी मागच्या आठवड्यात सविस्तर चर्चा केली होती. या इमारतीचे बांधकाम लगेच सुरू होणार असून, हे केंद्र लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती नितीन वानखेडे यांनी आयमाच्या शिष्टमंडळाला दिली. यावेळी आयमाचे सरचिटणीस निखिल पांचाल, दिलीप वाघ, राजेंद्र कोठवदे, कैलास आहेर आदि उद्योजक उपस्थित होते. (प्रतिनिधी)