शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेल कडाडले

By admin | Updated: August 19, 2016 00:52 IST

डाळी महागच : साखरेचे भाव चढे, भाज्यांचाही तोरा कायम

 नाशिक : सरकारकडून महागाई नियंत्रणात आल्याचा दावा होत असताना ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या किमतीत बुधवारी प्रति १५ लीटरच्या डब्यामागे ६० ते ७० रुपयांनी वाढ झाली. तर गेल्या वर्षाच्या तुलनेत तेलाच्या किमतीत आतापर्यंत प्रतिलिटर १० रुपयांनी वाढ झाली आहे. काही दिवसांपासून सतत वाढणाऱ्या महागाईमुळे सणाच्या काळात स्वयंपाक घरातील गोडवाही कमी झाला आहे. गेल्यावर्षी ३० ते ३१ रुपये प्रतिकिलो असलेली साखर ४० रुपयांपर्यंत गेली आहे. डाळीच्या किमती घसरल्याचे बोलले जात असले तरी ग्राहकांना सव्वाशे रुपयांहून अधिक दराने तूरडाळ विकत घ्यावी लागत आहे. त्यामुळे गृहिणींसमोर घरखर्चाचा प्रश्न निर्माण झाला असून शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक व विविध क्षेत्रातील कामगार आदिंसह सर्वसामान्य कुटुंबीयांचे अंदाजपत्रक कोलमडले आहे. गेल्या काही महिन्यांपासून डाळींच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांचे आर्थिक बजेट कोलमडले असून, तूरडाळ महागाईमुळे आवाक्याबाहेर गेल्याने सर्वसामान्यांच्या ताटातून वरण गायब झाले आहे. त्यासाठी तूरडाळीचे वितरण स्वस्त धान्य दुकानांद्वारे करण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी अद्यापही ग्राहकांना सहजरीत्या स्वस्त डाळ उपलब्ध होऊ शकत नाही. तर घाऊक बाजारातही तूरडाळीचे भाव १० ते २० रुपयांनी घसरल्याची चर्चा रंगत असली तरी प्रत्यक्ष ग्राहकाला अजून १२५ ते ते १३० रुपये किलो डाळ विकत घ्यावी लागत आहे. अशा स्थितीत सरकारकडून महागाई नियंत्रणात आल्याचा दावा केला जात असल्याने नेमके स्वस्त काय झाले, असा सवाल गृहिणींनी केला आहे. स्वयंपाक घरातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या तूरडाळीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गृहिणींकडून वरणाऐवजी इतर पदार्थांच्या पर्यायाचा शोध सुरू आहे. मात्र बाजारातील फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दरही अजून चढेच असल्याने ठरलेल्या अंदाजपत्रकात घरखर्च चालविताना महिलांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. (प्रतिनिधी)