शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांसाठी दसरा ठरला फलदायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 00:41 IST

नाशिक : ‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे ज्याचे वर्णन केले जाते, त्या दसरा सणापासूनच खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रचाराला वेग देण्याची वेळ इच्छुकांवर आली आहे. त्यामुळे महानगरासह जिल्हाभरातील इच्छुकांच्या हक्काच्या कार्यकर्त्यांना सकाळपासूनच प्रचाराला लागण्यास सांगण्यात आल्याने सर्वच इच्छुकांचे निकटचे कार्यकर्ते घरचं तोरण बांधून सकाळपासूनच उमेदवारांच्या कार्यालयात जमा होऊन प्रचाराला लागले. सुट्टीचा दिवस असल्याने बहुतांश नागरिक घरीच असण्याच्या संधीचा लाभ उठवत उमेदवारांनी प्रचार केल्याने मतांच्या सोन्यात भर घालण्यासाठी उमेदवारांसाठी दसरा फलदायी ठरला.

ठळक मुद्दे दसरा सणापासूनच खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रचाराला वेग

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे ज्याचे वर्णन केले जाते, त्या दसरा सणापासूनच खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रचाराला वेग देण्याची वेळ इच्छुकांवर आली आहे. त्यामुळे महानगरासह जिल्हाभरातील इच्छुकांच्या हक्काच्या कार्यकर्त्यांना सकाळपासूनच प्रचाराला लागण्यास सांगण्यात आल्याने सर्वच इच्छुकांचे निकटचे कार्यकर्ते घरचं तोरण बांधून सकाळपासूनच उमेदवारांच्या कार्यालयात जमा होऊन प्रचाराला लागले. सुट्टीचा दिवस असल्याने बहुतांश नागरिक घरीच असण्याच्या संधीचा लाभ उठवत उमेदवारांनी प्रचार केल्याने मतांच्या सोन्यात भर घालण्यासाठी उमेदवारांसाठी दसरा फलदायी ठरला.या दशकात राजकारण आणि प्रचाराचे सगळेच रंग बदलले आहेत. बदलत्या काळात वॉररूम आणि आॅनलाइन प्रचाराला जास्त महत्त्व मिळाले आहे. हे खरे असले तरी निकटचे कार्यकर्ते, तळमळीचे कार्यकर्ते तसेच नातेसंबंधातल्या कार्यकर्त्यांचे महत्त्व यत्किंचितही कमी झालेले नाही. किंबहुना पूर्वीसारखे पक्षाच्या हक्काच्या कार्यकर्त्यांची वानवा झालेली असताना अशा हक्काच्या, घरच्या कार्यकर्त्यांचे महत्त्व अधिकच वाढले आहे.साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा दसºयासारख्या आनंदाचा दिवस आपल्या कुटुंबासह आनंदात व्यतित करावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र, प्रचाराचा ज्वर वाढविण्यासाठी तसेच सर्व कुटुंबीय घरी एकत्रित मिळण्यासाठी दसºयाचा सुट्टीचा दिवस उपयुक्त असल्याने कार्यकर्त्यांसह उमेदवार देखील सकाळपासूनच गल्लोगल्ली फिरून संपर्क अभियान राबवू लागले. काही मतदारांनी घेतली फिरकीकाही उमेदवार गल्लोगल्लीतील रस्त्यांवरून फिरत मतदारांना आवाहन करीत होते, तर काहीजण प्रत्यक्ष घरोघरी फिरूनदेखील प्रचार करीत होते. अशावेळी मतदारांच्या घरातून उमेदवारांना शुभेच्छांसह आपट्याची पाने अर्थात सोने देऊन शुभेच्छादेखील दिल्या जात होत्या. मात्र, दोन-चार ठिकाणी काही चतुर मतदारांनी उमेदवारांनाच आम्ही तुमच्या सोन्याची वाट पाहतोय, असे सांगत ऐन प्रचारातदेखील उमेदवारांची फिरकी घेतल्याच्या घटना घडल्या.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Dasaraदसरा