देशमाने येथे जंतूनाशक फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 16:29 IST2020-03-24T16:28:48+5:302020-03-24T16:29:20+5:30

देशमाने : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील क्र ांतीगुरू सोशल फाऊंडेशनतर्फे दि. २३ मार्च ते १ एप्रिल २०२० पर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत गावात जंतूनाशक औषध फवारणी व वेगवेगळ्या उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.

 Disinfectant spraying here at Deshmane | देशमाने येथे जंतूनाशक फवारणी

देशमाने येथे जंतूनाशक फवारणी

क्र ांतिगुरु सोशल फाऊंडेशन या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी क्र ांतीगुरु सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजूजी कांबळे व जिल्हाध्यक्ष संजय खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली गावात जंतूनाशक फवारणी करण्यात आली. यावेळी खैरनार यांनी कारोनासंदर्भात काय उपयोजना करता येईल याविषयी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी क्र ांतीगुरु सोशल फाऊंडेशनचे येवला तालुका उपाध्यक्ष भगवान खरात, शंकर जाधव, नितिन खैरनार, माधव जाधव, विशाल खैरनार, दिपक जाधव, नंदू खैरनार, संतोष खैरनार, आकाश खैरनार आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title:  Disinfectant spraying here at Deshmane

टॅग्स :Healthआरोग्य