शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

ओझर ग्रामसभेत विविध प्रश्नांवर चर्चा

By admin | Updated: August 21, 2014 00:13 IST

ओझर ग्रामसभेत विविध प्रश्नांवर चर्चा

ओझर : येथील ग्रामसभा सरपंच हेमंत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी विविध नागरी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.भगतसिंगनगरात घंटागाडी ही येतच नसल्यामुळे कचरा हा येथील नागरिक शाळेच्या समोरच टाकतात. यापासून विद्यार्थ्यांना आजार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची मागणी एका शिक्षकाने केली. बाणगंगानगरातील रहिवासी महिला शौचालयाची दुरवस्था तसेच पुरुषांच्या शौचालयाची व्यवस्था करावी, असे नगरातील रहिवाशांनी प्रश्न उपस्थित केला.आरपीआयचे राज्य उपाध्यक्ष यांनी ओझर महाविद्यालय, शाळा यांच्याकडून अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शैक्षणिक शुल्क आकारू नये, तसेच समाजकल्याण खात्याचा अध्यादेश आपण सर्व शैक्षणिक संस्थांना देणार असल्याचा ठराव यावेळी केला. तसेच ओझरमध्ये वाढत्या चोऱ्या होत असून, यातील चोरलेल्या वस्तू भंगार बाजारात नेऊन विकतात. या भंगार जमा करणाऱ्या व्यापारीवर्गाने पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.जुना सिद्धपिंप्री रोड, खोतकर मळा, शेलार मळ्याजवळील रस्त्याबाबतची अनेक वर्षांपासूनची मागणी महिलांनी मांडली. ग्रामपंचायत सदस्य दखल घेत नसल्याची तक्रार करीत स्मशानभूमीच्या रस्त्यावर पथदीप बंद अवस्थेत आहे. तर पाण्याचा येथे पत्ताच नसल्याचे चौरे यांनी सांगितले. आनंदनगर भागातील पिण्याच्या पाण्याचा दाब तसेच रस्ते नवीन वस्तीत करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली.नितीन जाधव यांनी ओझर बसस्थानकावर असलेल्या गलिच्छ घाण, कचरा, पाणी तुंबणे याचबरोबर चिंचेच्या झाडावर बसणारे बगळे हे परिसरात घाण करतात. यामुळे दुर्गंधी पसरते याबाबत परिवहन खात्याने त्वरित तोडगा काढावा, असे सांगितले.मतदान यादीत आपले नाव तपासावे, तसेच ग्रामपंचायत कार्यालयात बीएलओचे फोन नं. लावण्यात येतील काही मतदान नोंदणीबाबत अडचण असेल तर तलाठी उल्हास देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन व वाचन केले. व्यासपीठावर आरपीआयचे रवींद्र जाधव, दादाभाऊ केदारे, भाऊसाहेब कदम, बाळासाो. सयाजी जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव पाटील, डॉ. महेश ठाकूर, संजय पगार, गोविंद चौरे, नितीन जाधव, सुकदेव चौरे, संजय देवकर आदि उपस्थित होते. (वार्ताहर)