शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बंद दरवाजाआड सिंहस्थ कामांची चर्चा

By admin | Updated: January 10, 2015 00:43 IST

भूसंपादनाचे गौडबंगाल : महापौर-उपमहापौरांचे गुफ्तगु; गटनेत्यांसह अन्य पदाधिकारीही बैठकीविषयी अंधारात

नाशिक : राज्य शासनाने सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी लागणाऱ्या निधीचा ७५ टक्के वाटा उचलण्याचे ठरविल्याने उत्साहात आलेल्या महापौर-उपमहापौर या दुकलीने स्थायी समिती सभापतीला सोबत घेत येणाऱ्या गंगाजळीचा ‘विनियोग’ नेमका कशासाठी करायचा याचे बंद दरवाजाआड गुफ्तगु केले आणि अधिकाऱ्यांनाही कामांना गती देण्याची सूचना करत ‘गतिमानते’ची आपली ‘अगतिकता’ही दाखवून दिली. स्थायी समितीने कोट्यवधी रुपयांचे भूसंपादनाचे प्रस्ताव फेटाळून लावल्याने त्यापाठीमागचे गौडबंगाल या तातडीने बोलविण्यात आलेल्या बैठकीत दडल्याची चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे प्रसिद्धी माध्यमांना अगोदर बैठकीचे आवतण देऊन नंतर त्यांच्याशिवाय बैठक पार पाडण्याचे कौशल्यही या पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिले असले तरी घरभेदीही असतात, याचे भान मात्र दुकलीला राहिलेले दिसत नाही. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेने २५ टक्के निधी उपलब्ध करून देताना ७५ टक्के निधीचा भार राज्य शासनाने सोसण्याची तयारी पालकमंत्र्यांनी दर्शविली आहे. त्यामुळे महापालिकेला सुमारे ६५० कोटी रुपये मिळणार आहेत. राजा उदार झाल्याने भारावलेल्या महापौर-उपमहापौर या दुकलीने सकाळी तातडीने निरोप देत अधिकाऱ्यांची सिंहस्थ कामांसंदर्भात आढावा बैठक बोलविली. महापौर एकदम ‘जागरूक’ झाल्याने अधिकारीही बुचकळ्यात पडले आणि बैठकीचा नेमका हेतू काय, याविषयी बराच वेळ महापौरांच्या दालनात घुटमळत बसले. सकाळी ११ वाजता बैठकीचे निरोप अधिकाऱ्यांना गेले तसे प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनाही पाठविण्यात आले. नियोजित वेळेपेक्षा तब्बल तासाभराने महापौर बैठकीसाठी दालनात अवतरले. त्यापाठोपाठ उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती आल्यानंतर महापौरांनी सर्व अधिकाऱ्यांना कॅबिनमध्ये आत बोलावून घेत बंद दरवाजाआड चर्चा सुरू केली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीचा वृत्तांत अधिकृतपणे महापौर-उपमहापौर या दुकलीने माध्यमांना कळविला नसला तरी बंद दरवाजाआड भूसंपादनाचा विषय अजेंड्यावर चर्चिला गेल्याचे कळते. स्थायी समितीने दोन दिवसांपूर्वी कोट्यवधी रुपयांचे भूसंपादनाचे प्रस्ताव फेटाळून लावले आहेत. त्यामुळे कोणते भूसंपादनाचे प्रस्ताव स्वीकारायचे अथवा कोणते नाकारायचे यावर खल झाल्याचे कळते. बैठकीदरम्यानच महापौर-उपमहापौर यांच्या दालनाबाहेर काही बांधकाम व्यावसायिकांचाही संचार दिसून आल्याने बंद दरवाजाआड झालेल्या बैठकीच्या चर्चेला पुष्टीच मिळाली. (प्रतिनिधी)