शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

दिलासा : धरणात गणेशमूर्ती, निर्माल्य विसर्जित करू नये यासाठी सेवाभावी संघटना सरसावल्या

By admin | Updated: August 21, 2014 00:13 IST

सरदवाडी धरण ‘ओव्हरफ्लो’

सरदवाडी : सिन्नर शहरासह पश्चिमपट्ट्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे शहराजवळील सरदवाडी धरण ओसंडून वाहू लागले आहे.सरदवाडी धरणातून सरदवाडी, लोणारवाडी, जामगाव व पास्ते या गावांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी पाणीयोजना राबविण्यात आली आहे. या योजनांसह सरदवाडी परिसरातील सुमारे दोनशे हेक्टर शेती सिंचनाखाली येते. मंगळवारी सायंकाळी शहरासह पश्चिमपट्ट्यातील सरदवाडी धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाला. यामुळे धरण ओव्हरफ्लो झाले. मंगळवारी दुपारपर्यंत सरदवाडी धरणात सुमारे ४० टक्के पाणीसाठा होता. मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास सरदवाडीसह जामगाव, पास्ते, माळेगाव या शिवारात जोरदार पाऊस झाला. धरणाच्या पश्चिमपट्ट्यातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला.सरदवाडी धरणाची साठवण क्षमता ७७ दक्षलक्ष घनफूट आहे. मात्र यात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने साठवणक्षमता कमी झाली आहे. शहर व उपनगरातील नागरिक दरवर्षी धरणात हजारो गणेशमूर्ती व निर्माल्याचे विसर्जन करतात. यामुळे धरणात जलप्रदूषण होण्यासह त्याची क्षमता कमी होऊ लागली आहे. मंगळवारी सायंकाळी शहरासह पश्चिमपट्ट्यात जोरदार पावसाने हजेरी लावली असली तरी पूर्वभागात अद्याप समाधानकारक पाऊस नसल्याने पाणीटंचाईची समस्या कायम आहे. (वार्ताहर)