शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाचे पैसे खात्यावर वर्ग करण्याची मागणी

By admin | Updated: January 20, 2017 00:41 IST

शेतमालाचे पैसे खात्यावर वर्ग करण्याची मागणी

खामखेडा : शेतकऱ्याने शेतमाल विक्र ी केल्यानंतर धनादेश न देता पैसे खात्यावर वर्ग करण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे.केंद्र सरकारने जुन्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर आर्थिक तुटवड निर्माण झाल्याने शेतमाल विक्र ी केल्यानंतर व्यापारी शेतकऱ्याला रोख स्वरूपात पैसे न देता बॅँकेचा धनादेश देत आहेत. या धनादेशाचे पैसे खात्यावर जमा होण्यास विलंब होत आहे. सध्या सर्वत्र लाल कांदा व मका काढण्याचा हंगाम चालू आहे. शेतकरी लाल कांदा व मका काढल्यानंतर लगेच विक्र ीसाठी मार्केटमध्ये विक्र ीसाठी नेत आहे. हा माल विक्री झाल्यानंतर आडतदाराकडून रोख पैसे न देता धनादेश देण्यात येत आहे. हा धनादेश शेतकऱ्याला राष्ट्रीयीकृत बॅँकेत जमा करावा लागतो. सध्या बॅँकेत मोठ्या प्रमाणात धनादेश जमा होत असल्याने वेळ आल्यास पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी धनादेश जमा करण्यात निघून जातात. परंतु काही धनादेश जमा करूनही शेतकऱ्यांच्या खाती पैसे जमा होत नाही. त्यामुळे शेतकऱ्याला काही वेळेस महिनाभर पैसे मिळण्यास उशीर होतो.आता सर्वच बॅँका आॅनलाइन जोडल्या गेल्या आहेत. नोटाबंदीला सत्तर दिवसांहून अधिक दिवस होऊनही अजूनदेखील ग्रामीण भागामध्ये भरपूर प्रमाणात चलन उपलब्ध नसल्याने बॅँकांमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी दिसून येत आहे. जरी रिझर्व्ह बॅँकेने एटीएममधून दहा हजार रुपये काढता येतील, असे जाहीर केले असले तरी ग्रामीण भागातील बँकांमध्ये अजूनही एटीएमची सोय नाही. तर सर्वच खातेदारांकडे तर एटीएम कार्ड उपलब्ध आहे, असेही नाही. त्यामुळे त्याला अकरा वाजेपर्यंत बॅँक उघडण्याची वाटप पहावी लागते. त्यामुळे अजूनही ग्रामीण भागातील बॅँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.(वार्ताहर)