शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कळवणची द्राक्षे दुबईच्या बाजारात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 14:42 IST

कळवण (मनोज देवरे) : तालुक्यासह सटाणा, कळवण, मालेगाव व देवळा तालुक्यांत पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र, चालू वर्षी द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाल्याने माल कमी प्रमाणावर निघत आहे. तरीही थोड्याफार शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या द्राक्षांची दुबईमध्ये निर्यात सुरू झाली आहे.

कळवण (मनोज देवरे) : तालुक्यासह सटाणा, कळवण, मालेगाव व देवळा तालुक्यांत पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र, चालू वर्षी द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाल्याने माल कमी प्रमाणावर निघत आहे. तरीही थोड्याफार शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या द्राक्षांची दुबईमध्ये निर्यात सुरू झाली आहे.भेंडी येथे सर्व सोयीसुविधायुक्त निर्यात केंद्र वातानुकूलित अशा स्वरूपाचे बांधण्यात आले आहे. या ठिकाणी शेतीमाल निर्यात सुविधा केंद्राला केंद्र सरकारच्या अपेडा या वाणज्यि मंत्रालयाने मान्यता दिल्याने निर्यात होऊ लागली आहे. कळवण तालुक्यातील शेतकरी व कळवण बाजार समितीत महाराष्ट्र राज्य कृषी व पणन मंडळ यांच्या सहकार्यातून सदगुरू एंटरप्राइजेसच्या माध्यमातून द्राक्षाची दुबईमध्ये निर्यात सुरू झाली आहे.शेतमालाची साठवणूक करून त्याची निर्यात करण्याची सुविधा भेंडी येथील कांदा, द्राक्ष सुविधा केंद्रात आहे. या भागातील मानूरचे भूमिपुत्र पणन मंडळाचे सरव्यवस्थापक सुनील पवार व कळवण येथील शेतकरी सहकारी संघाच्या पुढाकारातून महाराष्ट्र राज्य कृषी व पणन मंडळ पुणे यांच्या वतीने सुविधायुक्त निर्यात सुविधा केंद्र कळवण तालुक्यात उभारण्यात आले आहे. त्यामुळेच कसमादे पट्ट्यातील शेतीमाल निर्यातीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. द्राक्ष निर्यातीसाठी हाताळणी, प्रतवारी व वातानुकूलित प्रक्रि या करून द्राक्ष निर्यात सुरू झाली आहे. कसमादे परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे.कृषी व पणन मंडळाचे प्रभारी उपसरव्यवस्थापक बहादूर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरू आहे. निर्यातदार संस्थेचे प्रशांत नारकर, प्रांजली नारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वपाल मोरे, व्यवस्थापक सीताराम बिष्णोई, सांकेतिका जोरे आदी निर्यात सुविधा केंद्राच्या माध्यमातून शेतकर्यांसोबत कामकाज पाहत आहेत. थेट शेतात शेतीमालाची खरेदी करून परदेशात निर्यात केली जात असल्याची माहिती सदगुरू एंटरप्राइजेसचे संचालक प्रशांत नारकर व मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वपाल मोरे यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिक