शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

दुग्ध शाळेतील कर्मचाऱ्यांना कोर्ट, कचेऱ्यांचीच कामे

By admin | Updated: March 24, 2015 00:15 IST

सयंत्रे धूळखात : दिवसभर अधिकाऱ्यांच्या गप्पा

नाशिक : १ नोव्हेंबर २०१३ पासून दुग्ध सयंत्रे बंद असल्याने येथील अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांच्या हाताला जणू काही कुठलीच कामे शिल्लक उरली नाहीत. विभागातीलच काहींनी दाखल केलेल्या खटल्यांचा कोर्ट-कचेऱ्यांमध्ये पाठपुरावा करणे एवढेच काम येथील अधिकारी, तसेच कर्मचारी करीत असून, गप्पा-गोष्टींमध्ये त्यांचा दिवस भरत असल्याचे खुद्द येथील अधिकारी सांगतात.त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील शासकीय दूध योजना विभागात एकूण २० अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, याठिकाणी दुग्ध व्यवसायाशी संबंधित कुठलेच कामकाज चालत नसल्याने येथील कर्मचारी केवळ हजेरी लावण्यासाठी कार्यालयात चक्कर मारतात. १९५० साली शासनाने लाखो रुपये खर्च करून ५० हजार लिटर क्षमतेचे दूध प्रक्रिया सयंत्रे खरेदी केली होती. मात्र शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांनी तथा खासगी कंपन्यांनी शासनाला दूध विक्री बंद केल्याने १ नोव्हेंबर २०१३ पासून ही सयंत्रे बंद केली आहेत. यामुळे या विभागातील अधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांना फारशी कामे शिल्लक उरली नसून, दुग्ध व्यवसायाशी काहीही संबंध नसलेली कामे त्यांना करावी लागत आहेत. शासन हा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्याच्या विचाराधीन नसल्याने, जी कामे सांगितली जातील ती मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न असेल अशी भूमिका येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. (प्रतिनिधी)