शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

तुर्तास दिलासा : 'फास्टॅग'ला १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 17:16 IST

फास्टॅग एखाद्या मोबाइल रिचार्जप्रमाणे कुठल्याही आॅनलाइन पेमेंटच्या माध्यमातून किंवा काही खासगी व राष्ट्रयीकृत बॅँकांमधून रिचार्ज करता येईल, असा दावा प्राधिकरणाकडून करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे‘फास्टॅग स्टिकर’ काचेवर लावणे बंधनकारक आहे१५ तारखेपर्यंत वाहनचालकांसाठी सर्व लेन खुल्या राहतील.

नाशिक : १ डिसेंबरपासून शहरासह जिल्ह्यात नव्हे, तर राज्यभरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) वाहनधारकांकडून रोख स्वरूपात टोल शुल्काची रक्कम आकारणार नसल्याचा निर्णय गुरुवारी (दि.१४) जाहीर केला होता; मात्र हा निर्णय नागरिकांच्या सोयीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बदलला आहे. नागरिकांना पुरेसा कालावधी ‘फास्टॅग’ घेण्यासाठी मिळावा, म्हणून प्राधिकरणाने १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला.देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती महामार्गांच्या टोलनाक्यांवर फास्टॅग नसलेल्या वाहनांसाठी केवळ एकच लेन ठेवण्याचा निर्णय प्राधिकरणाने बोलून दाखविला होता; मात्र याबाबत दबाव व विरोध वाढल्यानंतर प्राधिकरणाने निर्णय बदलला असून, दि. १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तोपर्यंत फास्टॅग वाहनमालकांनी आपल्या वाहनावर लावणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. येत्या १५ तारखेपर्यंत वाहनचालकांसाठी सर्व लेन खुल्या राहतील. वाहनचालक नेहमीप्रमाणे रोख स्वरूपात टोलचे शुल्क भरू शकणार आहे. १५ डिसेंबरनंतर प्राधिकरणाकडून सर्व टोलनाक्यांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने शुल्क वसुली मोहीम राबविण्यासाठी फास्टॅगप्रणालीचा पुरेपूर वापर केला जाऊ शकतो, असे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यासाठी मोटारीच्या पुढील बाजूने चालकाच्या दिशेने विशिष्ट प्रकारचे ‘फास्टॅग स्टिकर’ काचेवर लावणे बंधनकारक आहे. फास्टॅग एखाद्या मोबाइल रिचार्जप्रमाणे कुठल्याही आॅनलाइन पेमेंटच्या माध्यमातून किंवा काही खासगी व राष्ट्रयीकृत बॅँकांमधून रिचार्ज करता येईल, असा दावा प्राधिकरणाकडून करण्यात आला आहे. यासाठी सध्या २२ खासगी व राष्ट्रीयकृत बॅँकांमध्ये तसेच प्रत्येक टोलनाक्यांवर आणि आॅनलाइन पेमेंट अ‍ॅप्लिकेशनवरदेखील फास्टॅग उपलब्ध करून देण्यात आल्याचे प्राधिकरणाचे म्हणणे आहे. घोटी टोलनाक्यावर सुमारे दहा हजार, पिंपळगाव टोल नाक्यावर ३५ हजारांपेक्षा अधिक फास्टॅग उपलब्ध करून देण्यात आले आहेत....तूर्तास मिळाला दिलासाफास्टॅगबाबत प्राधिकरणाने मुदतवाढ दिल्याने वाहनचालक-मालकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी जिल्ह्यातील कुठल्याही टोलनाक्यावर कायदासुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी प्राधिकरणाचे नाशिकचे व्यवस्था दिलीप पाटील यांच्यासह सर्व टोलनाक्यांवरील व्यवस्थापक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस ठाण्यांचे निरीक्षक यांची संयुक्त बैठक बोलावून एक लेनऐवजी तीन लेन फास्टॅग नसलेल्या वाहनांसाठी सुरू ठेवण्याचे आदेशित केले.

टॅग्स :National Highwayराष्ट्रीय महामार्गNashikनाशिकtollplazaटोलनाका