शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मातेच्या ट्विटने सापडली मुले

By admin | Updated: January 31, 2016 23:51 IST

रेल्वेमंत्र्यांची सतर्कता : झारखंडच्या मुलांचा नाशिकरोड स्थानकावर शोध

नाशिक : झारखंड राज्यातील दोन कुटुंबांमधील अल्पवयीन शाळकरी मुलगा-मुलगी बेपत्ता झाल्याची बाब मुलीच्या आईच्या निदर्शनास आल्यानंतर तिने मदतीसाठी थेट रेल्वेमंत्र्यांनाच ट्विटरवरून साद घातली. मदतीचा संदेश मंत्र्यांना मिळताच त्यांनी रेल्वे प्रशासनाला मुलांच्या शोधासाठी तातडीने सूचना दिल्या आणि अवघ्या काही तासांत नाशिकरोड स्थानकावर आलेल्या गीतांजली एक्स्प्रेसमध्ये सदरहू मुले आढळून आली.रेल्वेमंत्र्यांच्या आदेशानंतर संपूर्ण रेल्वेयंत्रणा कामाला लागली. त्यानुसार नाशिकरोड लोहमार्ग पोलिसांनी दुपारी मुंबईला जाणारी हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस रोखून यामध्ये शोध घेतला असता मुले सापडली. यावेळी एस-३० बोगीमध्ये ‘ते दोघे’ पोलिसांना आढळून आले. यावेळी पोलिसांनी त्यांना पोलीस चौकीत नेऊन बसविले आणि मुले मिळून आल्याचा संदेश मंत्रालयाला पाठविला.झारखंडच्या एका मोठ्या कंपनीत नोकरीला असलेल्या पालकाची अल्पवयीन मुलगी शाळेत शिकत असून, घरच्या कुटुंबातील ओळखीच्या कुटुंबातील एका मुलासोबत शाळेत मैत्री झाली. पुढे या मैत्रीचे रूपांतर थेट प्रेमामध्ये झाल्याने या दोघा अल्पवयीन मुलांनी थेट मुंबई गाठण्यासाठी घरातून कोणाला काहीही न सांगता ‘गीतांजली’ धरली. शुक्रवारी घरातून पलायन केलेल्या मुला-मुलींच्या कुटुंब चिंताग्रस्त झाले होते.दरम्यान, मुलीच्या आईने थेट रेल्वेमंत्र्यांच्या अकाउंटला ट्विट करून मुला-मुलींच्या शोधासाठी मदतीची याचना केली. आईचा संदेश मंत्र्यांना जेव्हा पोहचला तेव्हा ‘गीतांजली’ने भुसावळ रेल्वेस्थानक सोडले होते. दरम्यान, रेल्वेमंत्र्यांच्या आदेशाने संपूर्ण रेल्वे प्रशासन आणि लोहमार्ग पोलीस खडबडून जागे झाले. दुपारी साडेचार वाजता गीतांजली एक्स्प्रेस ही नाशिकरोड रेल्वेस्थानकावर येताच लोहमार्ग पोलिसांनी संपूर्ण तपासणी केली. (प्रतिनिधी)