नाशकात घरफोडीचे सत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 19:31 IST2020-01-17T19:26:46+5:302020-01-17T19:31:46+5:30
नाशिक शहरात बुधवारी अंबडमधील मुरारीनगर, जाधव संकूल परिसरात व गुरुवारी मुंबई नाका भागातील सूचितानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. मुरारीनगरमधील जाधव संकु ल येथील उत्तम महादू पाटील (५७) यांच्या घराचे अज्ञात चोरट्याने कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला

नाशकात घरफोडीचे सत्र सुरूच
नाशिक : शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून शहरातील मुंबई नाका व अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरपोडी झाल्याच्या घटनासमोर आल्या आहेत. याप्रकरणी मुंबई नाका व अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात बुधवारी अंबडमधील मुरारीनगर, जाधव संकूल परिसरात व गुरुवारी मुंबई नाका भागातील सूचितानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. मुरारीनगरमधील जाधव संकु ल येथील उत्तम महादू पाटील (५७) यांच्या घराचे अज्ञात चोरट्याने कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील हॉलमध्ये पाटील यांच्या पत्नीच्या पर्समध्ये असलेले दागिने व रोख रक्कम असा एकूण १८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला, तर मुंबईनाका भागातील सूचितानगर जॉगिंग ट्रॅकसमोरीस पारिजात अपार्टमेंटमधील सोनाली दिनेश तुपे ( २९) यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करीत तब्बल ९० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. यात १९ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, अर्धा तोळे वजनाची सोन्याची अंगठी, पाच ग्रॅम वजनाचे कानातले टॉप्स सोन्याचा नेकलेस व कानातील वेल असा एकूण ९० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद सोनाली तुपे यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दिली असून, या कारवाईत दोन अज्ञात चोरट्यांचा समावेश असल्याचा संशय व्यक्त होत आहे.