शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञातीसंस्थांच्या समर्थनासाठी चढाओढ

By admin | Updated: October 14, 2014 01:22 IST

ज्ञातीसंस्थांच्या समर्थनासाठी चढाओढ

 

नाशिक : काही तासांवर मतदानाची वेळ येऊन ठेपली असताना उमेदवारांकडून ज्ञातीसंस्थांचे समर्थन मिळविण्यासाठी चढाओढ लागली असून, त्या मोबदल्यात संबंधित ज्ञातीसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत ‘अर्थपूर्ण’ चर्चाही झडत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, काही ज्ञातीसंस्थांमध्ये समर्थनावरून असलेले मतभेदही उघड होताना दिसून येत आहेत. यंदा सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर लढत असल्याने मोठ्या प्रमाणावर मतविभागणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांना एकेका मतासाठी लढाई लढावी लागत आहे. मतदारसंघातील ज्ञातीसंस्थांचे एकगठ्ठा मतदान आपल्या झोळीत पडावे, यासाठी उमेदवारांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. वेगवेगळ्या समाजाची मंडळे, विश्वस्त संस्था, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा मंडळे यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याकडून समर्थन मिळविले जात आहे. समाजसंस्थांकडून समर्थन मिळविताना त्या मोबदल्यात संबंधित समाज संस्थेला देणगी, कार्यालयासाठी जागा, इमारत बांधून देणे, सभागृह बांधून देणे, अस्तित्वात असलेल्या इमारतीची रंगरंगोटी-दुरुस्ती करणे, क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे आदि आश्वासने दिली जात आहेत. उमेदवारांकडून संबंधित ज्ञातीसंस्थेकडून समर्थन मिळवितानाच तसे लेखी पत्र घेऊन ते वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याचीही तत्परता दाखविली जात आहे; मात्र काही ज्ञातीसंस्थांमध्ये दोन ते तीन गट असल्याने समर्थन देण्यावरून त्यांच्यातील मतभेदही उघड होत आहेत, तर ज्ञातीसंस्थांना आमचे मत ठरविण्याचा अधिकार कुणी दिला, अशाही तीव्र प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. ज्ञातीसंस्थांमधीलच काही प्रसिद्धीलोलुप पदाधिकारी चमकोगिरी करत असल्याचा आरोपही होताना दिसून येत आहे. (प्रतिनिधी)