शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज काढून खर्चाचा धाडसी अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:24 IST

नाशिक : गतवर्षात आर्थिक मंदी आणि कोरोनामुळे अर्थव्यस्थेला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला असताना केंद्र सरकारने तब्बल १५ लाख कोटींचे ...

नाशिक : गतवर्षात आर्थिक मंदी आणि कोरोनामुळे अर्थव्यस्थेला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला असताना केंद्र सरकारने तब्बल १५ लाख कोटींचे कर्ज काढून मोठ्या प्रमाणात भांडवली व महसुली खर्च करणारा धाडसी अर्थसंकल्प सादर केल्याचे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांनी व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचा कर न वाढवता ३५ हजार कोटी आरोग्यसेवेवर खर्च करण्याची व परवडणाऱ्या घरांच्या योजनेला मुदतवाढ देण्याची तरतूद करून सर्वसामान्यांना दिलासाही दिल्याचे त्यांनी नमूद केले.

सावानातर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृहात गुरुवारी (दि.४) ‘अर्थसंकल्प २०२१’ विषयावर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांचे विश्लेषण व्याख्यान आयोजित करण्यात ‌आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर सावानाचे कार्याध्यक्ष वसंत खैरनार, अर्थसचीव कुमार मुंगी, बी.जी वाघ, देवदत्त जोशी, प्रा. संगीता बाफना आदी उपस्थित होते. डॉ. विनायक गोविलकर म्हणाले, कोरोनामुळे केंद्र सरकारला मागील आर्थिक वर्षात अपेक्षित असलेल्या २०.२१ लाख कोटी महसुली उत्पनापैकी १५.५५ लाख कोटी म्हणजे जवळपास साडेचार लाख कोटी रुपयांचे उत्पन्न घटले आहे, तर ३०.४० लाख कोटींचा खर्च अपेक्षित असताना ३४.५० लाख कोटी खर्च झाल्याने साडेचार लाख कोटी अतिरिक्त खर्चाचा बोजा केंद्र सरकाच्या तिजोरीवर पडला. त्यामुळे सुमारे ९ लाख कोटींची वित्तीय तूट निर्माण झालेली असतानाच केंद्र सरकारने कोविडमधून बाहेर पडण्यासाठी आत्मनिर्भर योजनेसाठी २७ लाख कोटींचे पॅकज घोषित केले आहे. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आणि नागरिकांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी ३४ लाख ८३ हजार रुपये खर्चाचा अर्थसंकल्प मांडला आहे. यातील ४३ टक्के खर्च कर्जातून केला जाणार असून त्यासाठी जवळपास १५ लाख कोटींचे कर्ज घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रास्ताविक श्रीकांत बेणी यांनी केले, तर सूत्रसंचालन ॲड. भानुदास शौचे यांनी केले.

महागाई वाढणार

उत्पनाचे स्त्रोत कमी असून, खर्च अधिक असलेला वित्तीय तुटीचा हा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्र्यांनी १५ लाख कोटी रुपये कर्ज घेणार असल्याचे स्पष्ट केले; परंतु त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर व्याजाच्या आणि कर्ज परतफेडीच्या रुपाने अतिरिक्त खर्चाचा ताण पडणार आहे. शिवाय पैशाला मागणी वाढून किंमत वाढणार असल्याने बँकांचे व्याजदर व महागाई वाढण्याची शक्यताही डॉ. विनायक गोविलकर यांनी व्यक्त केली आहे.

(फोटो- नीलेश तांबे)