शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या पायाभूत चाचणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 15:38 IST

प्रथम भाषा, गणित आणि विज्ञान या विषयांमधील विद्यार्थ्यांची कामगिरी सुधारण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या पायाभूत चाचणीला मंगळवारपासून सुरुवात झाली असून परीक्षेच्या पहिल्या दिवशी दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी प्रमथ भाषेचा पेपर दिला. जिल्ह्यातील राज्यमंडळाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या मान्यताप्राप्त शाळांमध्ये इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठीं २८ ते ३१ आॅगस्टदरम्यान ही पायाभूत चाचणी परीक्षा घेण्यात येत असून जिल्हाभरातील विविध शाळांना या परीक्षांसाठी २८ लाख ३० हजार १०० प्रश्नपत्रिकांचे शाळांना वाटप करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देनाशिकमध्ये पायाभूत चाचणीला सुरुवात दुसरीपासून आठवीपर्यंच्या विद्यार्थ्यांची परीक्षाशाळांना २८ लाख ३० हजार १०० प्रश्नपत्रिकांचे वाटप

नाशिक : प्रथम भाषा, गणित आणि विज्ञान या विषयांमधील विद्यार्थ्यांची कामगिरी सुधारण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या पायाभूत चाचणीला मंगळवारपासून (दि.२८) सुरुवात झाली असून परीक्षेच्या पहिल्या दिवशी दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी प्रमथ भाषेचा पेपर दिला. जिल्ह्यातील राज्यमंडळाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या मान्यताप्राप्त शाळांमध्ये इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठीं २८ ते ३१ आॅगस्टदरम्यान ही पायाभूत चाचणी परीक्षा घेण्यात येत असून जिल्हाभरातील विविध शाळांना या परीक्षांसाठी २८ लाख ३० हजार १०० प्रश्नपत्रिकांचे शाळांना वाटप करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान विषयांमधील गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत पायाभूत चाचणी दरवर्षी घेतली जाते. यंदाही दुसरीसाठी प्रथम भाषा व गणित या विषयांवर, तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा व इंग्रजी या विषयांवर व  सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची प्रथम भाषा, गणित, विज्ञान व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांसाठी परीक्षा होणार आहेत. त्यातील इयत्ता दुसरी ते आठवीची प्रथम भाषा चाचणी मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत घेण्यात आली. तर गणित विषयाची चाचणी बुधवारी (दि.२९)  होणार आहे. त्यानंतर तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयाची चाचणी गुरुवारी (दि.३०) व सहावी ते आठवीच्या विद्याथ्यार्ची विज्ञान या विषयाची चाचणी शुक्रवारी (दि.३१) होणार आहे. चाचणी झाल्यावर एक आठवड्याच्या कालावधीनंतर शाळांना पेपर तपासणी पूर्ण करणे बंधनकारक असून ‘महास्टुडण्ट अ‍ॅप’च्या माध्यमातून गुण भरण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून शाळांना देण्यात आल्या आहेत.

 

टॅग्स :examपरीक्षाNashikनाशिकEducationशिक्षणStudentविद्यार्थी