शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
4
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
5
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
6
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
7
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
8
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
9
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
10
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
11
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
12
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
13
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
14
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
15
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
16
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
17
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
18
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
19
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
20
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
Daily Top 2Weekly Top 5

कुंभमेळ्यात आर्टिलरीची दोन हेलीकॉप्टर

By admin | Updated: April 9, 2015 00:38 IST

आपत्ती व्यवस्थापन : हेलीपॅडच्या जागेचा शोध

नाशिक : येथे जुलै महिन्यापासून सुरू होणाऱ्या कुंभमेळ्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी देवळाली कॅम्प येथील आर्टिलरी सेंटरने दोन हेलीकॉप्टर देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे आता शहरात हेलीपॅड उभारण्याची तयारी सुरू असून, जागेचा शोध सुरू आहे.कुंभमेळा सर्वार्थाने आव्हानात्मक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने बारकाईने नियोजन सुरू केले आहे. कुंभमेळ्यात कोणत्याही प्रकाराच्या आपत्तीशी मुकाबला करण्याची तयारी केली आहे. त्याअंतर्गत आपत्ती व्यवस्थापनाची बैठक झाली. यावेळी या विषयांवर चर्चा करण्यात आली. आर्टिलरी सेंटरने दोन हेलीकॉप्टर देण्याची तयारी केली आहे. आपत्तकालीन परिस्थितीत हे हेलीकॉप्टर उपयोगात येतील, त्यासाठीच दोन हेलीपॅड शहरात उभारण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासनाने आपल्या आवश्यकतेचे पत्र आर्टिलरी सेंटरला द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर येथेही अशाच प्रकारे हेलीपॅड तयार केली जाऊ शकते. दरम्यान, कुंभमेळ्यासाठी आता सूक्ष्म नियोजनाला प्रारंभ होत असून, गुरुवारपासून चार-चार विभागांच्या बैठका घेण्यात येणार आहेत. त्यातून प्रत्येक गोष्टीचे नियोजन आणि त्याचे आराखडे तयार केले जाणार आहेत. कोणत्याही सेक्टरमध्ये असलेले विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचे पथक आणि संपूर्ण शहर स्तरावर पथक अशा प्रकारची रचना असणार आहे. त्यामुळे निर्णय घेणे सोपे जाईल. वाहनतळासाठीदेखील तत्काळ निर्णयांसाठी तहसीलदार दर्जाचे अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत, अशा सर्व प्रकारच्या बारकाव्यांची चर्चा करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)