जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलिसांचे सशस्र संचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 01:47 AM2019-10-17T01:47:48+5:302019-10-17T01:48:07+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २१ आॅक्टोबरला मतदान होणार असल्याने मतदारांनी निर्भयपणे मतदानासाठी घराबाहेर पडावे याकरिता आणि त्यांच्यात प्रक्रियेबाबत सुरक्षितता व विश्वास निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलीस यंत्रणेमार्फत सशस्र पथसंचलन करण्यात आले.

Armed police operations in the district | जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलिसांचे सशस्र संचलन

जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलिसांचे सशस्र संचलन

Next

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २१ आॅक्टोबरला मतदान होणार असल्याने मतदारांनी निर्भयपणे मतदानासाठी घराबाहेर पडावे याकरिता आणि त्यांच्यात प्रक्रियेबाबत सुरक्षितता व विश्वास निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलीस यंत्रणेमार्फत सशस्र पथसंचलन करण्यात आले.
ओझर येथे पोलीस दलाकडून ओझर व सुकेना येथे पथसंचलन करण्यात आले. पोलीस उपअधीक्षक अरु ंधती राणे, पोलीस निरीक्षण भगवान मथुरे तसेच गुजरात राज्य राखीव दलातील ७६ जवानांनी ओझर व कसबे सुकेने गावातून संचलन केले.
वावीत पोलिसांचा रुटमार्च
सिन्नर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वावी पोलीस ठाण्याच्या वतीने रुटमार्च काढण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे याच्यां मार्गदर्शनाखाली वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदुरशिंगोटे, दोडी, चास या ठिकाणी रुटमार्च काढण्यात आला. यावेळी वावी पोलीस ठाण्याचे २ अधिकारी, ४३ पोलीस व होमगार्ड कर्मचारी, आरपीएसएफ ९ बटालियन, युआयडी ८३७ चे तीन अधिकारी व सुमारे ४५ पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
लासलगावी संचलन
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातर्फे लासलगावी मुख्य मार्गावरून सशस्त्र संचलन करण्यात आले. १५ कर्मचारी, २५ होमगार्ड व गुजरात राज्य राखीव पोलीस दल व ५० कर्मचारी या संचलनात सहभागी झाले होते.
लोहोणेरला सशस्त्र संचलन
लोहोणेर : २१ तारखेला होणाऱ्या मतदानाला मतदारांनी निर्भयपणे बाहेर पडावे म्हणून काल सायंकाळी देवळा पोलीस ठाण्याचे वतीने लोहोणेर गावातून सशस्त्र पोलीस संचलन करण्यात आले. अचानक सशस्त्र दलाचे जवानांसह पोलीस खात्याच्या गाड्याचा ताफा लोहोणेर गावात दाखल झाल्यानंतर निवडणुकीच्या पाशर््वभूमीवर लोकांनी कोणत्याही दडपशाही बळी न पडता निर्भयपणे मतदानाला बाहेर पडावे या पाशर््वभूमीवर हे संचलन करण्यात येत असल्याचे देवळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी सांगितले. या संचलनात सशस्त्र दलाच्या जवानांसह देवळा पोलीस ठाण्याची सर्व पोलीस कुमक सहभागी झाली होते.

Web Title: Armed police operations in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.