शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिक बिघाडामुळे बदलले २४२ मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 01:39 IST

जिल्ह्यात मतदान सुरळीत पार पडले असले तरी मतदान सुरू होत असतानाच २४२ मशीन बदलण्यात आले. यात ३६ ईव्हीएमचादेखील समावेश आहे. अर्थात, ही कार्यवाही तत्काळ करण्यात आल्याने मतदारांचा खोळंबा झाला नाही अवघ्या काही काही मिनिटांत मतदान सुरू झाले आहे.

नाशिक : जिल्ह्यात मतदान सुरळीत पार पडले असले तरी मतदान सुरू होत असतानाच २४२ मशीन बदलण्यात आले. यात ३६ ईव्हीएमचादेखील समावेश आहे. अर्थात, ही कार्यवाही तत्काळ करण्यात आल्याने मतदारांचा खोळंबा झाला नाही अवघ्या काही काही मिनिटांत मतदान सुरू झाले आहे. लासलगावसह इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य, नांदगाव तालुक्यातील आमोदे येथे मतदान यंत्रात बिघाड झाल्याने काहीवेळ प्रक्रिया थांबली होती.नाशिक जिल्ह्यात पंधरा मतदारसंघात एकूण आठ हजार ५७८ ईव्हीएम मशीनची व्यवस्था आहे. त्यात दहा टक्के ईव्हीएम जादा ठेवण्यात आली होती. कोठे यंत्रात बिघाड झाला तर विनाविलंब बदलण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. त्यानुसार निवडणूक शाखेने तत्काळ कार्यवाही केल्याने मतदारांची गैरसोय झाली नाही.नाशिक शहरात मतदानाला सकाळी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असताना अनेक ठिकाणी मतदान केंद्रातील ईव्हीएम बंद पडण्याच्या घटना घडल्या. नाशिक मध्य मतदारसंघात अटलबिहारी वाजपेयी मनपा शाळेत सकाळीच मतदार रांगेत असतानाच ईव्हीएम बंद पडल्याने खोळंबा झाला. काही वेळाने ते सुरू झाले. नाशिक पूर्व मतदारसंघात पंचवटीतील फुलेनगर येथील मनपा शाळेत बॅटरी खराब झाल्याने ईव्हीएम बंद पडले. त्यानंतर काही वेळाने ते सुरळीतझाले. पंचवटीतीच मखमलाबाद नाका येथील उदय कॉलनी येथे एका मतदाराने मतदान केल्यानंतर ईव्हीएम बंद पडले. तपासणी केल्यानंतर बॅटरीत बिघाड झाले असल्याचे निदर्शनास आले. बॅटरी बदलल्यानंतर ते सुरळीत झाले.पंचवटीत धामणकर महाविद्यालयात बुथ क्रमांक १८ मध्येही सकाळी ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ झाला होता. मात्र नंतर दहा मिनीटांनी मतदान सुरू झाले. नाशिक पश्चिम मतदारसंघातील कामटवाडे येथील विखे पाटील शाळेत मतदान केंद्र क्रमांक ३१६ मध्ये सकाळी आठ वाजता ईव्हीएम बंद पडले. त्यानंतर ते बदलण्यात आले त्यामुळे दहा मिनिटांनी मतदान सुरळीत झाले. त्यानंतर त्याच्या शेजारीत केंद्र क्रमांक ३१७ मध्येदेखील ईव्हीएम बंद पडले. परंतु पर्यायी यंत्र नसल्याने ते मागविण्यात आले. त्यामुळे जवळजवळ पाऊण तासांनी मतदान सुरू झाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकVotingमतदान