शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

५४ शिक्षकांचे वेतन दोन महिन्यांपासून बंद

By admin | Updated: February 25, 2016 23:36 IST

शिक्षण खात्याचा प्रताप : चूक अधिकाऱ्यांची कारवाई शिक्षकांवर

नाशिक : बंदीच्या कालावधीत दिलेल्या सवलतीचा वापर करून शिक्षक आणि शिक्षकेतरांना मान्यता देणाऱ्या अधिकाऱ्यांंबरोबरच शिक्षण खात्याने वादग्रस्त ठरलेल्या ५४ शिक्षक-शिक्षकेतरांचे वेतन पूर्णत: बंद केले असून दोन महिन्यांपासून त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. केवळ चौकशीसाठी प्रकरण प्रलंबित असताना कर्मचाऱ्यांचे वेतन दोन महिन्यांपासून रोखून काय साध्य होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य शासनाने अनुदानित शाळांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी शिक्षक आणि कर्मचारी बंदचा अभिनव पॅटर्न वापरून आर्थिक बचत सुरू केली होती. त्याचा शाळांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे. शासनाच्या या गोंधळात संस्थाचालकांकडून अध्यापन कसे करावे असा प्रश्न करण्यात येत असल्याने २०१२-१३ या वर्षात गणित, इंग्रजी, विज्ञान तसेच ठाणे आणि मुंबई विभागातील रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली होती. त्या आधारे ही मोहीम राबविण्यात आली खरी परंतु भरती प्रक्रियेसाठी आवश्यक पूर्वपरवानगी किंवा माहिती तपासण्यात आली नाही आणि तशीच मान्यता देण्यात आली असे राज्यभर घडल्याचा आणि त्यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्याचा दावा शिक्षण खात्याने केला आहे. त्यामुळे राज्यभर अधिकारी विशेषत: मान्यता देणाऱ्या प्राथमिक आणि माध्यमिक अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. शासकीय अधिकाऱ्यांनीच ही मान्यता दिल्याने शासनाने त्यांची चौकशी करणे आणि कारवाई करणे ओघानेच आले असले तरी या प्रकरणात मात्र नवनियुक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाच लक्ष्य करण्यात आले आहे. नोकरी मिळाल्याच्या आनंदात असलेल्या या शिक्षकांचे वेतन गेल्या दोन महिन्यांपासून बंद ठेवण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांचे कुटुंब त्यामुळे वाऱ्यावर आहेच, शिवाय मुलांचे शिक्षण, गृहकर्जाचे हप्ते न फेडण्याच्या या प्रकरणाने सारेच अडचणीत आले आहेत. शासनाने चौकशी जरूर करावी परंतु जोपर्यंत काही ठोस निष्पन्न होत नाही तोपर्यंत अशाप्रकारे शिक्षकांना अडचणीत आणण्याचे कारण काय, असा प्रश्न चर्चिला जात आहे. (प्रतिनिधी)