शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
5
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
6
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
7
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
8
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
9
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
10
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
11
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
12
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
13
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
15
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
16
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
17
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
18
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
19
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
20
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
Daily Top 2Weekly Top 5

‘श्रीं’च्या विसर्जनासाठी ३० कृत्रिम तलाव

By admin | Updated: September 23, 2015 23:44 IST

पालिकेची तयारी : मूर्ती व निर्माल्य संकलनाचीही स्वतंत्र व्यवस्था

नाशिक : शहरात गणेशोत्सवातील उत्साह आता शिगेला पोहोचला असून मंडळांनी साकारलेले देखावे-आरास पाहण्यासाठी भाविकांच्या गर्दीने रस्ते ओसंडून वाहताना दिसून येत आहेत. दरम्यान, येत्या रविवारी अनंतचतुर्दशीला श्रींच्या विसर्जनासाठी महापालिकेने शहरातील सहाही विभागात एकूण ५८ ठिकाणे निश्चित केली असून त्याठिकाणी आवश्यक ती सुविधा पुरविली जाणार आहे. याचबरोबर ३० ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती केली जाणार असून मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करण्याचेही काम हाती घेण्यात आले आहे. महापालिकेने गणरायाच्या विसर्जनासाठी संबंधित विभागांना जबाबदाऱ्यांचे वाटप केले असून त्यादृष्टीने कामांना सुरुवात झाली आहे. एकूण ५८ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात कृत्रिम तलावांचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रामुख्याने सिडको विभागात डे केअर स्कूल, गोविंदनगर सामाजिक सभागृह, राजे संभाजी स्टेडियम, अश्विननगर, नाशिक पश्चिम विभागात चोपडा लॉन्स पूल, चव्हाण कॉलनी गोदापार्क जॉगिंग ट्रॅकजवळ, फॉरेस्ट नर्सरी पूल गंगापूररोड, दोंदे पूल उंटवाडीरोड, येवलेकर मळा बॅडमिंटन हॉल, महात्मानगर पाण्याच्या टाकीजवळ, पंडित कॉलनीत लायन्स क्लब मैदान, सातपूर विभागात पाइपलाइनरोड रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ, विस्डम हायस्कूल रामेश्वरनगर, अशोकनगर पोलिस चौकी आणि शिवाजीनगर सूर्या मॉर्फी चौक, नाशिकरोड विभागात मनपा शाळा क्रमांक १२५ मुक्तिधाममागे, शिखरेवाडी मैदान, मनपा नर्सरी जयभवानी रोड, इंदिरा गांधी पुतळ्याजवळ नारायणबापू चौक, पंचवटी विभागात कोणार्कनगर गणेश मार्केट, गोपाळनगर, वाघाडी, आरटीओ कॉर्नर पेठरोड, गोरक्षनगर दिंडोरीरोड, राजमाता मंगल कार्यालय वाघाडी नदी, दत्तचौक किशोर सूर्यवंशी मार्ग आणि नाशिक पूर्व विभाग रामदास स्वामीनगर बस स्टॉप, साईनाथनगर चौफुली, किशोरनगर व राणेनगर याठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करून देण्यात येणार आहे. याशिवाय पारंपरिक पद्धतीने गोदाघाट परिसरात विसर्जनाची व्यवस्था राहणार आहे.