शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेतर्फे आठ शिक्षकांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 11:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेतर्फे आठ शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी शाळेपासून दुरावणार ...


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषदेतर्फे आठ शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी शाळेपासून दुरावणार नाही यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा सिमा वळवी यांनी यावेळी बोलतांना केले.
जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये जिल्हा परिषद शाळा, अजेपूर ता. नंदुरबारचे विशाल दिलीप पाटील, जिल्हा परिषद शाळा, वडसत्रा ता.नवापूरचे हेमंत बाबुराव सुर्यवंशी, जिल्हा परिषद शाळा म्हसावद (मुली) ता.शहादाचे रविंद्र सजन बैसाणे, जिल्हा परिषद शाळा दलेलपूर, ता.तळोदाचे नितीन बन्सीलाल महाजन, जिल्हा परिषद शाळा चिवलउतार ता. अक्कलकुवाचे जगदीश देवीदास पाटील, जिल्हा परिषद शाळा,चिंचकाठी ता.धडगांवचे अनिल फुरता पाडवी, जिल्हा परिषद शाळा बलवंड ता.नंदुरबारच्या सुशिलाबाई अंकुशराव पाटील, जिल्हा परिषद शाळा टेंभली ता.शहादयांच्याु रेखा सुरेश पाटील या शिक्षकांचा समावेश आहे.
जिल्हा परिषद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी अध्यक्ष अ‍ॅड.सीमा वळवी होत्या. उपाध्यक्ष तथा बांधकाम व अर्थ समिती सभापती अ‍ॅड.राम रघुवंशी, आरोग्य व शिक्षण सभापती जयश्री पाटील, समाज कल्याण समिती सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी शेखर रौंदळ, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता रमेश चौधरी, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. आर. रोकडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.व्ही. कदम उपस्थित होते.
प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनी केले. आभार माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी मानले. सुत्रसंचालन किरण दाभाडे यांनी केले.
सिमा वळवी यांनी सांगितले, जिल्ह्यात शिक्षणाचा प्रसार वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावे. कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्या तरी एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहणार नाही यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांची शिक्षणाबाबतची गोडी कमी होऊ देऊ नका असे आवाहन देखील त्यांनी केले. प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ यांनीही मनोगत व्यक्त केले. शिक्षकांतर्फे हेमंत सूर्यवशंी यांनी मनोगत व्यक्त केले.