डाब येथील याहामोगी यात्रोत्सव स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:28 IST2021-03-07T04:28:08+5:302021-03-07T04:28:08+5:30

या दरम्यान, बाहेर गावाहून येणाऱ्या व्यावसायिकांना दुकाने थाटण्यास मनाई करण्यात आली असून, बाहेरून येणाऱ्या भाविकांनीही दर्शनासाठी येऊ नये, असे ...

Yahamogi Yatra at Dab postponed | डाब येथील याहामोगी यात्रोत्सव स्थगित

डाब येथील याहामोगी यात्रोत्सव स्थगित

या दरम्यान, बाहेर गावाहून येणाऱ्या व्यावसायिकांना दुकाने थाटण्यास मनाई करण्यात आली असून, बाहेरून येणाऱ्या भाविकांनीही दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन मंदिर समितीच्यावतीने करण्यात आले आहे. याबाबत मोलगी पोलीस ठाण्याचे पाेलीस निरीक्षक निवृत्ती पवार, मंदिर समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यात सर्वानुमते ठराव करण्यात आला. या वेळी उपस्थित नागरिकांना पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची माहिती दिली. या सूचनांचे नागरिकांनी पालन करीत प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले.

कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावापासून स्वत:ची व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले. याप्रसंगी मंदिर समिती प्रमुख, सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, पोलीस पाटील, फौजदार महेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.

Web Title: Yahamogi Yatra at Dab postponed