शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: विजयकुमार गावीत यांच्या विरोधात कोण लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 13:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार  : नंदुरबार विधानसभा मतदारसंघात भाजपने आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांची उमेदवारी मंगळवारी जाहीर केली असून काँग्रेस-राष्ट्रवादी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार  : नंदुरबार विधानसभा मतदारसंघात भाजपने आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांची उमेदवारी मंगळवारी जाहीर केली असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने मात्र अद्यापही येथे उमेदवार जाहीर न केल्याने त्यांच्याविरोधात कोण लढणार? याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने जिल्ह्यातील चारही जागा काँग्रेसच्या वाटय़ाला दिल्या आहेत. काँग्रेसने दोन दिवसांपूर्वीच उमेदवार जाहीर केले. त्यात जिल्ह्यातील नवापूर, अक्कलकुवा व शहादा या तिन्ही ठिकाणचे उमेदवार जाहीर केले. पण नंदुरबारमध्ये मात्र उमेदवार जाहीर केला नव्हता. येथील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चुणूक लागल्यामुळे पक्षाने नंदुरबारचा निर्णय राखीव ठेवल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, रघुवंशींनी आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून भाजपनेही नंदुरबारची उमेदवारी आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांना जाहीर केली आहे. याठिकाणी रघुवंशी विरुद्ध गावीत अशीच लढत असते. मात्र रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर युतीला त्याचा फायदा होईल. अशा स्थितीत गावीतांच्या विरोधात तोलामोलाचा सक्षम उमेदवार देण्यासाठी काँग्रेस कुठली रणनीती आखते याकडे सर्वाचे लक्ष असून उमेदवार कोण राहील त्याबाबत उत्सुकता लागून आहे. दरम्यान, या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने दीपा वळवी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.